High Court : निवृत्त न्यायमूर्ती गौतम पटेल यांना धमक्या आणि कुटुंबियांवरील हल्ला हा संपूर्ण भारतीय न्याय व्यवस्थेवरील हल्ला , उच्च न्यायालयाचा संताप

विशेष प्रतिनिधी

मुंबई :High Court राज्य सरकारला निवृत्त न्यायमूर्ती गौतम पटेल यांना सुरक्षा देण्याचे निर्देश तर केंद्र सरकारला पटेल यांच्या इंग्लंडमधील मुलीच्या सुरक्षेबाबत अहवाल सादर करण्याची नोटीस जारी करण्यात आली. दाऊदी बोहरा समाजातील उत्तराधिकार वादावर साल 2024 मध्ये दिलेल्या निकालावरून मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती गौतम पटेल आणि त्यांच्या कुटुंबीयांना धमक्या येत असल्याची हायकोर्टानं सोमवारी गंभीर दखल घेतलीय. गौतम पटेल आणि त्यांच्या कुटुंबीयांना तातडीनं सुरक्षा पुरवण्याचे आदेश देत, केंद्र सरकारला पटेल यांच्या इग्लंडमध्ये स्थायिक असलेल्या मुलीच्या सुरक्षेसाठी काय उपाययोजना केल्यात? याची माहिती सादर करण्याकरता नोटीस जारी केलीय.High Court

गौतम पटेल हे सध्या भारतात परतले असून त्यांनी यासंदर्भात गावदेवी पोलीस ठाण्यात रितसर तक्रार दिली आहे. पटेल यांच्या पत्नीला इथं धमकीची पत्रं आली होती, तर इग्लंडमध्ये पटेल यांच्या मुलीवर हल्ला करण्यात आलाय. याची दखल घेत मुंबई पोलिसांनी गावदेवी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केलाय. तसंच गौतम पटेल यांच्या मुंबईतील घराबाहेर दोन पोलीस हवालदार तैनात केल्याची माहिती मुख्य सरकारी वकील शिशिर हिरे यांनी सोमवारच्या सुनावणीत हायकोर्टात दिली.High Court



 

न्यायमूर्ती गौतम पटेल यांच्यावरील हल्ला हा पूर्ण न्यायपालिकेवरील हल्ला आहे. हे प्रकरण अतिशय गांभि र्यानं घेत आपण हा संदेश समाजात दिला पाहिजे की न्यायव्यवस्था अश्या धमक्यांना हलक्यात घेत नाही. गौतम पटेल घराबाहेर पडणार नाहीत का? या शब्दांत मुंबई उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायमर्ती रवींद्र घुगे यांनी राज्य सरकारला मुंबईत परतलेल्या गौतम पटेल आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या सुरक्षेची काळजी घेण्याचे निर्देश दिलेत. तसंच केंद्र सरकारलाही गौतम पटेल यांची इग्लंडस्थित मुलगी अदिती हिच्या तिथल्या सुरक्षेचा आढावा घेत पुढील सुनावणीत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिलेत.

या सुनावणी दरम्यान मुंबई उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायामूर्ती रवींद्र घुगे यांनी सरन्यायाधीश सूर्यकांत यांचेही आभार मानले. घुगे म्हणाले की, आमचं भाग्यय की आम्हाला न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्यासारखे सन्यायाधीश लाभलेत. सरन्यायाधीश हे काही कारणानं लंडनला गेले होते. तेव्हा त्यांना या गोष्टीची माहिती मिळताच त्यांनी तिथं मुलीसोबत असलेल्या निवृत्त न्यायमूर्ती गौतम पटेल यांची भेट घेतली. इतकंच नव्हे तर तिथल्या भारतीय उच्चायुक्त पी. कुमारन यांची भेट घेत गौतम पटेल यांच्या कुटुंबीयांना सुरक्षा देण्याचे निर्देश दिले. त्यानंतर हर्टफोर्डशायर पोलिसांनी अदिती पटेल यांना सुरक्षा पुरवलीय.

बॉम्बे बार असोसिएशन, एडवोकेट्स असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडिया आणि बॉम्बे इनकॉरपोरेटेड लॉ सोसायटी यांनी यासंदर्भात दाखल केलेल्या याचिकेवर सोमवारी मुंबई उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती गौतम अंखड यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. गेल्या दहा महिन्यांपासून न्यायमूर्ती गौतम पटेल यांना पत्रांद्वारे अनेक हिंसक धमक्या देण्यात येतायत. 5 जून 2026 रोजी पटेल यांच्या लंडनस्थित मुलीला जर्मनीहून धमकीचं पत्र पाठवण्यात आलेलं आहे. तसेच काही महिन्यांपू्र्वी पटेल यांच्या मुलीवर लंडनमध्ये हल्ला झाल्याचीही घटना घडली होती. या प्रकरणाची दखल घेत बॉम्बे बार असोसिएशनसह इतरही सर्व वकिल संघटनांनी आपला निषेध व्यक्त केलाय. बॉम्बे बार असोसिएशनच्या नेतृत्त्वात सर्व संघटनांनी मिळून हायकोर्टात एक जनहित याचिका दाखल केलीय. एका निवृत्त न्यायमूर्ती आणि त्यांच्या कुटुंबाला दिलेल्या धमक्यांचा निषेध करत यातील दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी याचिकेतून केली गेली आहे. माजी न्यायमूर्ती पटेल आणि त्यांच्या कुटुंबाप्रती वकिल संगटनांनी आपली एकजूट दाखवली असून या धमक्यांमागे असलेल्यांना ओळखण्यासाठी आणि अटक करण्यासाठी सखोल तपास करण्याची मागणी करण्यात आलीय.

न्यायमूर्ती गौतम पटेल यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या मुलीला जे पत्र पाठवण्यात आलंय त्यात सांगण्यात आलंय की, गौतम पटेल यांनी स्वतःचा एक व्हिडिओ रेकॉर्ड करून तो सोशल मीडियावर प्रसिद्ध करावा. या व्हिडिओमध्ये त्यांनी सय्यदना (समाजाच्या आध्यात्मिक नेत्याला दिली जाणारी पदवी) प्रकरणावरील दिलेला निकाल हा दबावाखाली दिल्याचं कबूल करावं. तसेच असा निकाल दिल्याबद्दल माजी न्यायमूर्तींनी जाहीर माफी मागावी, अशी ताकीद या पत्रामध्ये देण्यात आलीय. जर्मन टपाल विभागाचा शिक्का असलेल्या या पत्रासोबत एक डिजिटल स्टोरेज डिव्हाइसही पटेल यांना पाठवण्यात आलं होतं. याप्रकरणी स्थानिक पोलिसांत रितसर तक्रार देण्यात आली असून सर्व गोष्टी आणि पुरावे आता लंडन पोलिसांच्या ताब्यात आहेत, आणि ते याप्रकरणी पुढील तपास करत असल्याचं निवृत्त न्यायमूर्ती गौतम पटेल यांनी सांगितलंय.

Attack on Retired Justice Gautam Patel and Threats to Family Amount to Assault on India’s Entire Judicial System: High Court Expresses Outrage

महत्वाच्या बातम्या