विशेष प्रतिनिधी
पनवेल : आता राज्यातील जिल्हा परिषदेच्या बहुतांश शाळा या खासगी शाळांपेक्षाही चांगल्या पाहायला मिळतात. जिल्हा परिषदेच्या शाळांमधील शिक्षण हे 90 टक्के खासगी शाळांपेक्षा चांगले असल्याचे काैतुक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. Devendra Fadnavis
शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पनवेलमधील वहाळ येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये हजेरी लावली. या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी स्वतः विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. यावेळी बाेलताना मुख्यमंत्री म्हणाले, विद्यार्थ्यांची शिस्त उत्तम आहे. उत्साह चांगला आहे. ज्ञानही चांगले आहे. याचा अर्थ शिक्षक-शिक्षिका चांगल्या प्रकारे विद्यार्थ्यांना शिकवत आहेत.
एक काळ होता, जेव्हा जिल्हा परिषदेची शाळा म्हटल्यावर ती शाळा अतिशय मोडकळीस आलेली, व्यवस्था नसलेली अशा प्रकारची शाळा पाहायला मिळत होती. आता जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये मुल्य शिक्षणही सुरू करण्यात आले आहे. संवैधानिक मुल्य ही मुलांना माहिती असली पाहिजेच. हक्क आणि कर्तव्याची जाणीव असली पाहिजे, स्वच्छता, पर्यावरण यासंदर्भातील जागृती असली पाहिजे. एक अतिशय चांगला नागरिक या शाळांमध्ये तयार झाला पाहिजे.
रायगड जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेमध्ये मी आल्यानंतर मला अतिशय आनंद झाला. पहिल्यांदा तर जी लॅब या शाळेत तयार करकण्यात आली आहे. ती अतिशय सुंदर अशा प्रकारची डिजीटल लॅब आहे. ज्यामध्ये सर्व वर्गातील जो काही कोर्स आहे, तो डिजीटली दृकश्राव्य माध्यमातून उपलब्ध आहे. शिक्षकांना तो शिकवताही येईल आणि तिथेच ऑनलाइन परीक्षासुद्धा होईल. त्यामुळे डिजीटल युगातील डिजीटल विद्यार्थ्यांना साक्षर करण्याचे हे उत्तम असे साधन आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
Most Zilla Parishad Schools Better Than Private Institutions, Says Devendra Fadnavis
महत्वाच्या बातम्या