विशेष प्रतिनिधी
मुंबई : Jain Monk दादर परिसरातील जैन मंदिरांबाहेर रस्त्यांवर काढण्यात आलेल्या पांढऱ्या पट्ट्यांच्या मुद्द्यावरून निर्माण झालेला वाद आणखी चिघळण्याची चिन्हे दिसत आहेत. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी या पांढऱ्या पट्ट्यांविरोधात आक्रमक भूमिका घेतल्यानंतर जैन समाजाच्या प्रतिनिधींनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी जैन धर्मगुरू निलेशचंद्र मुनी आणि काही स्थानिक मराठी महिलांमध्ये शाब्दिक चकमक झाल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. Jain Monk
मिळालेल्या माहितीनुसार, दादरमधील जैन मंदिर परिसरात काढण्यात आलेल्या पांढऱ्या पट्ट्यांबाबत जैन धर्मगुरू माध्यमांशी संवाद साधत होते. त्याचवेळी परिसरातील काही महिला आपले मत आणि आक्षेप मांडत होत्या. संवादादरम्यान वातावरण तापले आणि जैन धर्मगुरूंनी मोठ्या आवाजात “अरे ए, आवाज खाली…” असे म्हणत प्रतिक्रिया दिली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर विविध स्तरांतून प्रतिक्रिया उमटत आहेत. Jain Monk
दरम्यान, मनसे नेते संदीप देशपांडे यांनी पांढऱ्या पट्ट्यांच्या विरोधात भूमिका घेत महापालिकेला ते तातडीने हटविण्याची मागणी केली आहे. त्यांच्या भूमिकेवर प्रतिक्रिया देताना जैन धर्मगुरू निलेशचंद्र मुनी यांनी संदीप देशपांडे यांच्यावर दोन समाजांमध्ये दरी निर्माण करण्याचा आरोप केला.
“जैन समाज हा शांतताप्रिय समाज आहे. याचा अर्थ असा नाही की जैन समाजाने बांगड्या भरल्या आहेत. मात्र, समाजातील सर्वांनी शांतता राखावी आणि अनावश्यक विरोध टाळावा,” असे आवाहन निलेशचंद्र मुनी यांनी केले.
यावेळी त्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचाही उल्लेख केला. “जर संदीप देशपांडे बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर चालत असतील, तर त्यांनी हेही लक्षात घ्यावे की बाळासाहेब ठाकरे यांनी जैन आणि मारवाडी समाजावर नेहमी प्रेम केले. त्यांच्या काळात या समाजांना कधीही त्रास देण्यात आला नाही,” असे ते म्हणाले.
War of Words Erupts Between Jain Monk and Local Women Over White Stripe Controversy
महत्वाच्या बातम्या