विशेष प्रतिनिधी
मुंबई : Fadnavis Government राज्यातील महिलांसाठी महत्त्वाची असलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत मोठा दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी या योजनेतील ई-केवायसी दुरुस्तीसाठी मुदत वाढवण्यात आल्याची घोषणा केली आहे. यापूर्वी ही अंतिम तारीख 31 मार्चपर्यंत होती, मात्र आता ती थेट 30 एप्रिलपर्यंत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे लाभार्थी महिलांना कागदपत्रे आणि माहिती दुरुस्त करण्यासाठी आणखी एक महिना मिळाला आहे.Fadnavis Government
या निर्णयामागे राज्य सरकारची स्पष्ट भूमिका असल्याचेही तटकरे यांनी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या सूचनेनुसार ही मुदतवाढ देण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राज्यातील जास्तीत जास्त महिलांना योजनेचा लाभमिळावा आणि तांत्रिक कारणांमुळे कोणीही वंचित राहू नये, हा या निर्णयामागील उद्देश असल्याचेही त्यांनी सांगितले.Fadnavis Government
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जुलै 2024 पासून राज्यात सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. या योजनेमुळे अनेक कुटुंबांना आधार मिळत असून महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला चालना मिळत आहे. मात्र ई-केवायसी प्रक्रियेत काही महिलांकडून त्रुटी राहिल्यामुळे त्यांना अडचणी येत होत्या. त्यामुळे ही मुदतवाढ शेवटची संधी, असल्याचेही तटकरे यांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान, भोंदू अशोक खरात प्रकरणावरून सुरू असलेल्या टीकेलाही आदिती तटकरे यांनी उत्तर दिले. या प्रकरणावरून केली जाणारी टीका दुर्दैवी असल्याचे त्यांनी म्हटले. घटना समोर आल्यानंतर सर्वप्रथम प्रतिक्रिया देणाऱ्यांमध्ये आपण होतो, असे त्यांनी सांगितले. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात एसआयटी स्थापन केली असून तिचे नेतृत्व अनुभवी महिला पोलिस अधिकाऱ्यांकडे दिले असल्याचे त्यांनी नमूद केले.
पीडित महिलांना न्याय मिळणे हे सरकारचे सर्वोच्च प्राधान्य असल्याचे सांगत तटकरे यांनी स्पष्ट केले की, दोषींना कठोर शिक्षा झालीच पाहिजे. सरकारची भूमिका ठाम असून तपास प्रक्रियेत कोणतीही ढिलाई होणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. महिलांवर अन्याय झाल्यास त्यांच्यासाठी न्याय मिळवून देणे हीच सरकारची भूमिका असल्याचे त्यांनी पुन्हा अधोरेखित केले.
विलिनीकरणाच्या मुद्द्यावरही आदिती तटकरे यांनी भाष्य केले. सुनील तटकरे यांनी केलेल्या वक्तव्याचा उल्लेख करत त्यांनी सांगितले की, ‘दादा’ जिवंत असताना आणि त्यांच्या पश्चात झालेल्या विलिनीकरणाच्या चर्चामध्ये मोठा फरक आहे. त्या काळात अचानक झालेल्या घटनेमुळे आणि विविध वक्तव्यांमुळे पक्षात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते.
तटकरे पुढे म्हणाल्या की, शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये या विषयावर सुसंघटित चर्चा झाली होती, मात्र अजित पवार यांच्या गटात तशी सुसंगत भूमिका दिसली नाही. तसेच दादांनंतर सुनेत्रा पवार यांना राष्ट्रीय अध्यक्ष करावे, अशी कोणतीही अधिकृत भूमिका मांडली गेली नव्हती. या सर्व गोष्टींमुळे पक्षांतर्गत संभ्रम वाढल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
Big Relief for Women: Fadnavis Government Extends e-KYC Deadline to April 30
महत्वाच्या बातम्या
- Mandatory PNG Shift : सुविधेच्या ठिकाणी पीएनजी जोडणी घ्यावीच लागणार; एलपीजीवरील ताण कमी करण्यासाठी निर्णय
- देशात अनेक शहरांमध्ये इंधनासाठी रांगा; पण प्रत्यक्षात देशात इंधनाचा पुरेसा साठा; मोदी सरकारचा खुलासा
- Amid West Asia : एप्रिलमध्ये रशियाकडून 6 कोटी बॅरल कच्चे तेल खरेदी करेल भारत; सवलतीऐवजी प्रीमियमवर मिळेल
- कुटुंब टिकले तरच धर्म आणि राष्ट्र टिकेल, समाज सुरक्षित राहील; पुण्यातल्या कोथरूड मधल्या विराट संमेलनात एकमुखी सूर