विशेष प्रतिनिधी
पुणे : आगामी मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमाच्या अनुषंगाने सध्याच्या मतदारांची २००२ च्या मतदार यादीशी पडताळणी (मॅपिंग) करण्यात येत आहे.
तसेच मतदारांच्या तपशीलातील (नाव, लिंग, वय, फोटो, पत्ता इ.) आवश्यक दुरुस्त्या करण्याची कार्यवाही सुरू आहे. या कामाचा नियमित आढावा घेण्यासाठी केंद्रस्तरीय अधिकारी व पर्यवेक्षक यांच्या बैठका घेतल्या जात आहेत.
मात्र, कामात कोणतीही प्रगती न करणाऱ्या, हलगर्जीपणा करणाऱ्या तसेच मतदारांना प्रतिसाद न देणाऱ्या २१४ पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदार संघातील यादी भाग क्र. २२८ व २३० येथील मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांविरोधात उपजिल्हाधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी सिद्धार्थ भंडारे यांनी कठोर पावले उचलली आहेत.
त्याअनुषंगाने संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध लोकप्रतिनिधित्व अधिनियमांतर्गत बंडगार्डन पोलिस ठाण्यात दि. ०२ एप्रिल २०२६ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Case Filed Against Two Booth-Level Officers in Pune for Negligence in Voter List Work
महत्वाच्या बातम्या
- Mandatory PNG Shift : सुविधेच्या ठिकाणी पीएनजी जोडणी घ्यावीच लागणार; एलपीजीवरील ताण कमी करण्यासाठी निर्णय
- देशात अनेक शहरांमध्ये इंधनासाठी रांगा; पण प्रत्यक्षात देशात इंधनाचा पुरेसा साठा; मोदी सरकारचा खुलासा
- Amid West Asia : एप्रिलमध्ये रशियाकडून 6 कोटी बॅरल कच्चे तेल खरेदी करेल भारत; सवलतीऐवजी प्रीमियमवर मिळेल
- कुटुंब टिकले तरच धर्म आणि राष्ट्र टिकेल, समाज सुरक्षित राहील; पुण्यातल्या कोथरूड मधल्या विराट संमेलनात एकमुखी सूर