विशेष प्रतिनिधी
परभणी:शिवसेना ठाकरे गटाचे विद्यमान खासदार संजय जाधव भाजपा मध्ये प्रवेश करणार असल्याचा चर्चांनी जोर धरला आहे.खासदार संजय जाधव यांचा संभाव्य पक्षांतराने फक्त परभणी जिल्ह्याचेच नाहीतर मराठवाड्यातील राजकारण ढवळून निघण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान,राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी संजय जाधव यांचा प्रवेशावर प्रतिक्रिया देताना म्हणल्या की,जाधव यांनी भाजपा मध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्यास,त्यांचे स्वागतच केले जाईल,अशी स्पष्ट भूमिका मांडली.त्यांचा या विधानामुळे चर्चांना अधिकच बळ मिळाले असून,भाजपकडून संजय जाधवांच्या प्रवेशासाठी सकारात्मक वातावरण तयार होत असल्याचे बोलले जात आहे.
संजय जाधव हे परभणी जिल्ह्यातील शिवसेनेचे मातब्बर नेते मानले जातात.मागील काही वर्षांत त्यांनी प्रत्येक निवडणुकीत त्यांची ताकत दाखवून दिली आहे.शिवसेना फुटल्यानंतर संजय जाधव यांनी अनेकवेळा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जहरी टीका केली आहे.
जिल्ह्यातील संघर्ष वाढणार…
संजय जाधव यांचा चर्चेत असलेल्या भाजपा प्रवेशामुळे जिल्ह्यातील राजकारणात संघर्ष वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.भाजपा मध्ये पूर्वीपासून सक्रिय असलेल्या नेते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये वर्चस्वाची स्पर्धा तीव्र होऊ शकते.संजय जाधव यांचा प्रवेशामुळे जून भाजपा कार्यकर्ते आणि नवीन येणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये मतभेद निर्माण होऊ शकतात.
मेघना बोर्डीकर संघर्षाला आमंत्रण देतायत का?
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांचे वडील आणि भाजपा नेते रामप्रसाद बोर्डीकर २०२९ लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक असल्याचे सांगितले जात आहे.जर हे समीकरण खरे ठरले,तर संजय जाधव यांचा भाजपा प्रवेशाने आगामी काळात लोकसभा निवडणुकीत उमेदवारीसाठी तीव्र स्पर्धा आणि संघर्ष होण्याची शक्यता आहे.
Political activities accelerate in Parbhani; Will the conflict in the district increase after Sanjay Jadhav’s entry into the BJP?
महत्वाच्या बातम्या
- CM : महिलांना लोकसभेत आणि विधानसभेत देण्याचा निर्णय हे महात्मा फुले यांना खरे अभिवादन, मुख्यमंत्र्यांची भावना
- Amol Mitkari : अमोल मिटकरींनी यांची ‘जस्टिस फॉर दादा’ आंदोलनाची हाक
- “महात्मा फुले यांच्या विचारांची आज सर्वाधिक गरज” – अभिनेता गिरीश कुलकर्णी यांनी फुलेवाड्यात व्यक्त केली खंत!
- भुजबळांचे हेलिकॉप्टर थेट कार पार्किंगमध्ये! मोठा अनर्थ टळला..