निवडणुकीआधीच निकाल स्पष्ट! पुणे महापालिकेच्या १३ प्रभाग समित्यांवर बिनविरोध अध्यक्षांची वर्णी तर 2 ठिकाणी संघर्ष!

विशेष प्रतिनिधी

पुणे: महापालिकेच्या १५ प्रभाग समित्यांच्या अध्यक्षपदाचा धुराळा लवकरच उडणार आहे.येत्या २१ एप्रिलला होणाऱ्या या निवडणुकीचं चित्र आता जवळपास स्पष्ट झालंय. १५ पैकी तब्बल १३ जागांवर निवडणुका बिनविरोध होणार आहेत. यातलं विशेष म्हणजे १२ जागांवर फक्त भाजपचेच अर्ज आल्याने तिथे कमळ फुलणार हे नक्की झालंय, तर एका ठिकाणी काँग्रेसचा अध्यक्ष बिनविरोध होणार आहे.

बहुतांश ठिकाणी भाजपचं बहुमत असल्यामुळे इतर पक्षांनी तिथे आपले उमेदवार उभे करण्याचं धाडस दाखवलं नाही. त्यामुळे १२ ठिकाणी भाजपचे अध्यक्ष बिनविरोध निवडून येणार आहेत. वानवडीमध्ये मात्र फक्त काँग्रेसचा अर्ज आल्याने तिथे त्यांचा मार्ग मोकळा झालाय.

दोन ठिकाणी रंगणार सामना

सगळीकडे बिनविरोध कारभार सुरू असताना ढोले पाटील रोड आणि येरवडा-वडगाव शेरी या दोन ठिकाणी मात्र चुरस पाहायला मिळणार आहे. तिथे एकापेक्षा जास्त अर्ज आल्यामुळे आता मतदान होणार आहे.



प्रभाग समित्या आणि अध्यक्षपदाचे उमेदवार

नगर रोड-वाघोली: अनिल सातव (भाजप) – (बिनविरोध)

येरवडा-वडगाव शेरी: कविता गलांडे (भाजप) आणि विशाल मलके (काँग्रेस) – (निवडणूक होणार)

ढोले पाटील रोड: सुरेखा कवडे (राष्ट्रवादी काँग्रेस- भाजप पाठिंबा) आणि (वैशाली भालेराव काँग्रेस) – (निवडणूक होणार)

छत्रपती शिवाजीनगर-घोले रोड: अमृता म्हेत्रे (भाजप) – (बिनविरोध)

औंध-बाणेर: रोहिणी चिमटे (भाजप) – (बिनविरोध)

कोथरूड-बावधन: वासंती जाधव (भाजप) – (बिनविरोध)

वारजे-कर्वेनगर: मंजुश्री खर्डेकर (भाजप) – (बिनविरोध)

सिंहगड रोड:सचिन मोरे (भाजप) – (बिनविरोध)

धनकवडी-कात्रज-आंबेगाव: प्रतिभा चोरगे (भाजप) – (बिनविरोध)

कोंढवा-उंड्री: रंजना टिळेकर (भाजप) – (बिनविरोध)

हडपसर-मांजरी: प्रशांत ऊर्फ मामा तुपे (भाजप) – (बिनविरोध)

वानवडी: साहिल केदारी (काँग्रेस) – (बिनविरोध)

बिबवेवाडी:मनीषा चोरबेले (भाजप) – (बिनविरोध)

कसबा पेठ:उज्ज्वला यादव (भाजप) – (बिनविरोध)

विश्रामबागवाडा: राघवेंद्र मानकर (भाजप) – (बिनविरोध)

२१ एप्रिलला अधिकृत शिक्कामोर्तब होईल, पण सध्या तरी ‘कुणी कुठं बसायचं’ हे जवळपास ठरलंय. आता फक्त त्या दोन ठिकाणच्या निकालाकडं सगळ्यांचं लक्ष लागलंय!

PMC Ward Elections: 13 Chairpersons elected unopposed, 2 seats to witness a fight!

महत्वाच्या बातम्या