विशेष प्रतिनिधी
पुणे: राज्यातून पुणे ते जबलपूर रेल्वे नियमित करण्याचा पुण्यात नवा राजकीय वाद निर्माण झाला आहे.काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोहन जोशी यांनी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांना लिहून या निर्णयावर आक्षेप नोंदवला आहे.पुण्यातील नागरिकांच्या गरजांकडे कानाडोळा करून इतर राज्यातील रेल्वे सेवांना प्राधान्य देण्यात येत असल्याचा आरोप त्यांनी पत्रातून केला आहे.
मोहन जोशी यांनी पत्रात म्हटले आहे की, पुण्याचे खासदार असतानाही मुरलीधर मोहोळ यांनी स्थानिक प्रवाशांच्या मूलभूत मागण्यांकडे दुर्लक्ष केले आहे. पुणे ते जबलपूर रेल्वे सेवा नियमित करण्याचा निर्णय नेमका कुणाच्या हितासाठी घेतला आहे, असा थेट सवाल मोहन जोशी यांनी उपस्थित केला आहे. ‘ पुणेकरांना आवश्यक असलेल्या सेवा प्रलंबित ठेवून बाहेरील राज्यांसाठी गाड्या सुरू करणे हा अन्याय आहे ‘ असे जोशी यांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान, पुण्यातील रेल्वे व्यवस्थेतील बदलांवरही मोहन जोशी यांनी नाराजी व्यक्त केली आहे.महाराष्ट्रांतर्गत धावणाऱ्या अनेक गाड्यांचे टर्मिनस हडपसरला हलवले जात असताना, उत्तर भारतात धावणाऱ्या गाड्या मात्र पुणे स्थानकावरूनच सोडल्या जात असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. हा भेदभाव करणारा निर्णय असून, पुणेकर प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असल्याचे त्यांनी पत्रात म्हटले आहे.
प्रलंबित मागण्यांकडे दुर्लक्ष
पुणे – मुंबई, पुणे – नाशिक आणि पुणे – संभाजीनगर या महत्वाच्या मार्गावर नवीन रेल्वे सेवा सुरू करण्याची मागणी अनेक वर्षांपासून होत आहे.मात्र या मागण्यांकडे पूर्ण दुर्लक्ष करून पुणे – जबलपूरसारख्या सेवांना प्राधान्य दिले जात असल्याची टीका मोहन जोशी यांनी केली.
लोकल सेवा विस्कळीत..
पुणे ते लोणावळा लोकल सेवा विस्कळीत असल्याचा मुद्दादेखील मोहन जोशी यांनी उपस्थित केला आहे.
रेल्वे स्थानकावरील अस्वच्छता, अस्वच्छता, सुरक्षेचा अभाव आणि अपुऱ्या सुविधा यामुळे प्रवाशांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
Controversy erupts over Pune-Jabalpur railway; Mohan Joshi questions Mohola in letter!
महत्वाच्या बातम्या
- पुण्यातून शिंदे गटाचा विधान परिषदेचा उमेदवार कोण; अंतिम क्षणी नवा चेहरा येणार?
- सोशल मीडियावरील पैसे घेतल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर दोन वाहतूक पोलीस निलंबित
- २,००० कोटींच्या गैरव्यवहाराच्या चौकशीचा मार्ग मोकळा; प्रशांत वाघमारेंना सुप्रीम कोर्टाचा दणका!
- शरद पवार ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल