Devendra Fadnavis भाषेच्या नावावर हिंसा करणे मान्य नाही, मुख्यमंत्र्यांचा इशारा

विशेष प्रतिनिधी

नागपूर : देशात कोणावरही जबरदस्ती करून भाषेच्या नावावर हिंसा करणे आम्हाला मान्य नाही. त्यामुळे परप्रांतियांना मराठी शिकवू. मात्र कोणावरही अन्याय होऊ देणार नाही,” असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.  Devendra Fadnavis

राज्यातील ऑटो रिक्षा, टॅक्सी तसेच इतर सर्व सार्वजनिक वाहतूक वाहनांचे परवाने घेण्यासाठी चालकांना प्रवाशांशी मराठीत संवाद साधणे अनिवार्य करण्याचा प्रस्ताव राज्य शासनाने तयार केला आहे. यासाठी महाराष्ट्र मोटार वाहन नियम,१९८९मधील नियम ४, ७८ आणि ८५मध्ये सुधारणा करण्याचा मसुदा तयार केला असून, चालकांना मराठी भाषेचे ‘व्यावहारिक ज्ञान’ असणे बंधनकारक करण्याची तरतूद करण्यात आली आहे. Devendra Fadnavis

याच मुद्द्यावरून राजकीय संघर्ष सुरू असून, दहिसरमध्ये शिंदेसेना व मनसेचे कार्यकर्ते शुक्रवारी दुपारी आमनेसामने आले. त्यांच्यात घोषणाबाजी झाली; पण, पोलिसांनी हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात ठेवली. मराठी सक्तीच्या मुद्द्यावरून शिंदेसेनेतही मतभेद असून, शिंदेसेनेचे उपनेते व माजी खासदार संजय निरुपम यांनी सक्तीला विरोध केला आहे.



यावर मुख्यमंत्री म्हणाले,मुंबई असो किंवा महाराष्ट्रात मराठी बोलण्यासाठी आग्रह होणे अथवा प्राधान्य देणे, याच काहीही चुकीचं नाही. मात्र, यावरून वाद होऊ नये, ही सरकारची भूमिका आहे. ज्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी येत नाही, त्यांना मराठी भाषा शिकवली जाईल. Devendra Fadnavis

दरम्यान, मराठी सक्तीच्या मुद्द्यावर निरुपम यांनी मराठी भाषेची सक्त्ती केल्याने ऑटो-टॅक्सीचालकांच्या मूलभूत हक्कांवर गदा येईल, असे मत व्यक्त करीत निर्णयाचा फेरविचार करण्याची मागणी केली आहे. तर शिंदेसेनेच्या प्रवक्त्त्या शीतल म्हात्रे यांनी सरनाईक यांना पाठिंबा दिला आहे. Devendra Fadnavis

प्रत्येक राज्यात त्या राज्याच्या राजभाषेचा सन्मान झालाच पाहिजे, असे मत व्यक्त करीत मराठी सक्ती योग्यच असल्याची भूमिका व्यक्त केली आहे. निरुपम यांनी दहिसरमध्ये जाऊन संवाद साधला आणि तेथे मनसेने निदर्शने केली. शिंदेसेना आणि मनसेतील नेत्यांमध्ये असलेल्या मतभेदांना दहिसरमधील स्थानिक राजकारणाचीही किनार असल्याची चर्चा आहे.

Violence in the name of language unacceptable, cm Devendra Fadnavis warns

महत्वाच्या बातम्या