विशेष प्रतिनिधी
पुणे: शहरातील अनधिकृत होर्डिंगला लगाम घालण्यासाठी पुणे महानगरपालिकेकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे.अनधिकृत होर्डिंग्ज ओळखण्यासाठी आता होर्डिंगला क्यूआर कोड लावला जाणार आहे.महापालिकेकडून नवीन डिजिटल व्यवस्था लागून करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे,२७ एप्रिल पासून याची अंमलबजावणी सुरू होणार आहे.
पुणे शहरात ३ हजार ३५ अनधिकृत होर्डिंग्ज आहेत.तर दीड हजार अनधिकृत होर्डिंग्ज आहेत.मात्र,अधिकृत व अनधिकृत होर्डिंग्ज मधील फरक ओळखणे अधिकाऱ्यांना शक्य होत नाही.त्यामुळे महापालिकेचा शुल्क बुडवणे सहज शक्य होत आहे.
महापालिकेच्या परवाना व आकाशचिन्ह विभागांतर्गत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांमुळे शहरातील होर्डिंग्ज ची संपूर्ण माहिती नागरिकांना मोबाईलवर उपलब्ध होणार आहे. क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर होर्डिंगचा परवाना क्रमांक, वैधता कालावधी, मालकाची माहिती इत्यादी माहिती सहज उपलब्ध होणार आहे.
महापालिकेच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाकडून हे क्यूआर कोड तयार केले जाणार आहेत.जाहिरात कंपन्यांना होर्डिंगवर ठरवून देण्यात आलेल्या ठिकाणी लावले बंधनकारक आहे. क्यूआर कोड मधील माहितीमध्ये बदल करण्यासाठी महापालिकेची परवानगी आवश्यक आहे.नियमांचे उल्लंघन करणाऱ्या जाहिरात कंपन्यांवर कारवाई करण्यात येणार असून,अधिकाऱ्यांची जबाबदारी देखील निश्चित केली जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
Scan hoardings, get information! Pune Municipal Corporation’s new digital system launched
महत्वाच्या बातम्या
- पुण्याच्या सौंदर्याचा ‘बळी’ देऊन मलिदा लाटण्याचा डाव; १५ वर्षांत कोट्यवधींच्या उलाढालीचे नियोजन!
- नाशिक पाठोपाठ मुंबईत कॉर्पोरेट जिहाद, तरुणीचा अश्लील मेसेजद्वारे छळ
- भाजपाची ३० उमेदवारांची यादी तयार! दिल्लीत होणार शिक्कामोर्तब; “या”नावांचा समावेश..
- janaakrosh rally : जनआक्रोश रॅलीच्या आयोजकांवर गुन्हा दाखल