बुधवार पेठेत पोलिसांचे मोठे ‘कोंबिंग ऑपरेशन’; १५ बांगलादेशी नागरिकांसह कुंटणखाना मालक अटकेत!

विशेष प्रतिनिधी

पुणे: पुणे शहरात गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली असून, काल रात्री बुधवार पेठेतील कुप्रसिद्ध ‘डिस्को’ आणि ‘माचिस’ बिल्डिंगवर पोलिसांनी छापा टाकला. परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त (DCP) कृषिकेश रावले यांच्या थेट मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या या यशस्वी ‘कोंबिंग ऑपरेशन’मुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. Bangladeshi

५ तासांची थरारक कारवाई

मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई काल रात्री उशिरा ११:३० वाजता सुरू झाली आणि पहाटे ५ वाजेपर्यंत सुरू होती. पोलिसांनी संपूर्ण परिसराला वेढा घालून इमारतींची झाडाझडती घेतली. या मोहिमेत एकूण १८ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.



बांगलादेशी रॅकेट आणि अल्पवयीन मुलीची सुटका

या कारवाईचे सर्वात धक्कादायक पैलू म्हणजे यात १५ बांगलादेशी नागरिकांचा समावेश आहे. यामध्ये ११ महिला, ३ पुरुष आणि एका लहान मुलाचा समावेश आहे. धक्कादायक बाब म्हणजे, वेश्याव्यवसायाच्या या दलदलीतून पोलिसांनी एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीची सुटका केली आहे, जिला सक्तीने या व्यवसायात ढकलण्यात आले होते.

या व्यवसायाचा मुख्य सूत्रधार आणि इमारतीचा मालक सुमित मिलिंद चव्हाण याच्यासह ‘अक्का’ ज्योती ऊर्फ सबीना शेख आणि दोन व्यवस्थापकांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी घटनास्थळावरून संशयितांचे मोबाईल फोन आणि हिशोबाच्या महत्त्वाच्या डायऱ्या जप्त केल्या आहेत. या डायऱ्यांमधून या रॅकेटचे धागेदोरे कोठपर्यंत पसरले आहेत, याचा तपास आता पोलीस करत आहेत.

DCP कृषिकेश रावले यांच्या नेतृत्वाखालील या धडक कारवाईमुळे बेकायदेशीर कृत्य करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. अवैध मानवी तस्करी आणि वेश्याव्यवसाय विरोधात पुण्यात यापुढेही अशाच प्रकारची कठोर पावले उचलली जातील, असा विश्वास पोलीस प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला आहे.

Major ‘Combing Operation’ in Budhwar Peth: 15 Bangladeshi Nationals and Brothel Owner Arrested!

महत्वाच्या बातम्या