विशेष प्रतिनिधी
पुणे: शहरातील स्वतःच्या घराच्या प्रतीक्षेत असणाऱ्या नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे.पिंपरी चिंचवड जवळील ताथवडे येथे म्हाडाच्या घरांसाठी ८ जुलै २०२६ रोजी सोडणार जाहीर होणार आहे.त्यासाठी २७ एप्रिल म्हणजेच सोमवारपासून अर्जाच्या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे.म्हाडाच्या पुणे महामंडळाने ७९२ घरांचा सोडतीची माहिती रविवार प्रसिद्ध केली.
काही वर्षापूर्वी पिंपरी चिंचवड मधील ताथवडे येथे गृहप्रकल्प उभारणीस सुरुवात झाली.संबंधित जागेवर दोन टप्प्यात घरे बांधण्याचा निर्णय घेण्यात आला होता.पहिल्या टप्प्यात ६०० पेक्षा जास्त घरांची विक्री प्रक्रिया याअगोदरच पूर्ण झाली आहे.सध्या दुसऱ्या टप्प्यातील ७९२ घरांची सोडत जाहीर करण्यात आली आहे.दुसऱ्या टप्प्यातील काम येत्या ४ महिन्यात पूर्ण होणार आहे.
सदरील सोडतीमध्ये कमी उत्पन्न असलेल्या गटासाठी देखील घरे असून,त्यांची किंमत ४६ ते ४७ लाख रुपये असणार आहे.७९२ घरांपैकी २४ घरे कमी उत्पन्न असलेल्या गटासाठी राखीव ठेवण्यात आली आहेत.मध्यम गटातील घरांची किंमत ६४ लाख ५० हजार रुपये ते ६५ लाख ५० हजार रुपयांचा दरम्यान असेल.
अर्ज नोंदणी कधीपासून?
या सोडतीसाठी सोमवारी, 27 एप्रिल रोजी, दुपारी दीड वाजल्यापासून नागरिकांना ऑनलाइन नोंदणी करून अर्ज करता येणार आहे. त्यानंतर 2 जूनपर्यंत अनामत रक्कमेसह अर्ज सादर करण्याची मुदत म्हाडाकडून देण्यात आली आहे. सोडतीत सहभागी होण्याकरिता ही अनामत रक्कम भरणे गरजेचे आहे. अल्प गटासाठी अनामत रक्क 50 हजार रुपये आहे. तर, मध्यम गटासाठी अमानत रक्कम 75 हजार रुपये असेल. या व्यतिरिक्त नागरिकांना अर्ज भरताना विनापरतावा 708 रुपये अर्ज शुल्क भरावा लागेल. 30 जून रोजी पात्र अर्जांची यादी जाहीर करून नंतर 8 जुलै रोजी दुपारी 12 वाजता सोडत जाहीर होईल. 8 जुलैला हा निकाल ऑनलाइन पद्धतीने जाहीर करण्यात येणार आहे.
Good news for Pune residents! Lottery of 792 MHADA houses announced in Tathawade; Application process begins from April 27
महत्वाच्या बातम्या
- पुण्याच्या सौंदर्याचा ‘बळी’ देऊन मलिदा लाटण्याचा डाव; १५ वर्षांत कोट्यवधींच्या उलाढालीचे नियोजन!
- नाशिक पाठोपाठ मुंबईत कॉर्पोरेट जिहाद, तरुणीचा अश्लील मेसेजद्वारे छळ
- भाजपाची ३० उमेदवारांची यादी तयार! दिल्लीत होणार शिक्कामोर्तब; “या”नावांचा समावेश..
- janaakrosh rally : जनआक्रोश रॅलीच्या आयोजकांवर गुन्हा दाखल