शिवसेनेची ताकद सतत वाढत असल्यामुळे उबाठाचे तोंड कडू, डॉ. ज्योती वाघमारे यांचा हल्लाबोल

विशेष प्रतिनिधी

मुंबई: शिवसेनेची ताकद सतत वाढत असल्यामुळे उबाठाचे तोंड कडू झालंय. ज्यांना वास्तवाचा सामना करता येत नाही त्यांचा इतरांच्या भरभराटीमुळे जळून कोळसा होता. पण, कोळसा कितीही उगाळले तरी काळाच असतो तशी यांची वृत्ती काळी आहे, असा हल्लाबोल शिवसेना खासदार डॉ. ज्योती वाघमारे यांनी केला

वाघमारे म्हणाल्या, काँग्रेसच्या खोडावर उबाठाच्या द्वेषाची वेल वाढत आहे. उबाठाला हिरवी पालवी फुटलेली आहे. शिवसेनेच्या झाडाला लागत असलेली भगवी फुले त्यांच्या डोळ्यात खूपत आहेत.संजय राऊत पत्रकार परिषदेत म्हणाले होते की उद्धट ठाकरे यांनी विधान परिषदेत जावे अशी पक्षाची इच्छा आहे. ⁠



पक्षाने दानवाला परिषदेवर पाठवले.आपल्या पक्षात काय चालले आहे, कोणाला संधी मिळणार आहे हे सुद्धा ज्याला माहिती नाही, त्याच्या तोंडपाटीलकीला कवडीचीही किंमत नाही. ⁠मैदानात येऊन लढाई लढायची आपल्या धन्याची छाती नाही, हे सांगायची या पोपटाची हिंमत नाही. उध्दव ठाकरे यांनी या निवडणुकीतून पळ का काढला याचं उत्तर आधी संजय राऊत यांनी द्यायला हवं… ⁠हे बौद्धिक दिव्यांग असून, यांना मदतीची गरज आहे. ⁠यांनी बच्चू कडू यांच्या प्रहार या सामाजिक संघटनेकडे अर्ज केला पाहिजे.

बच्चू कडू यांच्या संदर्भात बोलताना त्यांनी म्हटले की, “ उबाठाने मंत्रिमंडळात घेतले तेव्हा बच्चू कडू फार गुणी होते आणि ते शिवसेनेत आल्यावर उबाठाला त्यांच्यातल्या अवगुणांचा साक्षात्कार झाला.

Dr. Jyoti Waghmare in sharp attack

महत्वाच्या बातम्या