विशेष प्रतिनिधी
पुणे: महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो प्रकल्पाबाबत दिलासादायक बातमी समोर आली आहे.शहरातील वाढती वाहतूक कोंडी,महत्वाचे म्हणजे हिंजवडी आयटी पार्क परिसरातील वाहनांचा ताण कमी करण्यासाठी हा टप्पा आता अत्यंत महत्वाचा मानला जातो.या मेट्रो प्रकल्पाचा पहिला टप्पा आता अंतिम टप्प्यात पोहोचला असून,हिंजवडी ते बालेवाडी हा मार्ग ३१ मे पर्यंत वाहतुकीसाठी खुला करण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे.
हिंजवडी परिसर हा पुण्याचा आयटी क्षेत्राचा केंद्रबिंदू मानला जातो.दररोज हजारो आयटी कर्मचारी या भागात ये जा करतात. मात्र,गेल्या काही वर्षांत वाढलेल्या वाहनसंखेमुळे या परिसरातील वाहतूक कोंडी गंभीर समस्या बनली आहे.सकाळ आणि संध्याकाळच्या गर्दीच्या वेळी अनेक नागरिकांना तासनतास ट्रॅफिक मध्ये अडकून पडावे लागते.
माण – हिंजवडी – बालेवाडी दरम्यान १२ मेट्रो स्थानकांचे काम 95 टक्के अनुदान अधिक पूर्ण झाले असून, राहिलेली दुरुस्ती,स्थानक सजावट आणि तांत्रिक कामे सध्या सुरू आहेत. याशिवाय मेट्रोच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या तांत्रिक चाचण्या, सिग्नलिंग सिस्टीम, ट्रॅक तपासणी आणि आपत्कालीन व्यवस्था पडताळणी अंतिम टप्प्यात आहे.
दरम्यान,१५ मे रोजी ‘ टाटा ‘ आणि पीएमआरडीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय आढावा बैठक होणार आहे. या बैठकीत प्रत्यक्ष प्रकल्पाच्या सविस्तर आढावा घेण्यात येणार आहे.पहिला टप्पा नियोजित वेळेत सुरू करण्याबाबत अंतिम निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.या बैठकीनंतर मेट्रोच्या उद्घाटनाचा मार्गी स्पष्ट होईल,असे सांगितले जात आहे.
३१ मे पर्यंत मेट्रो सेवा सुरू झाली, तर बालेवाडी स्टेडियमपर्यंतचा प्रवास जलद आणि आरामदायी होणार आहे.
Big good news for Pune residents! The first phase of Hinjewadi-Shivajinagar Metro is likely to be inaugurated by May 31…
महत्वाच्या बातम्या
- मराठी अनिवार्यतेवर सरकार ठाम; चालकांना मराठी शिकण्यासाठी मुदतीची शक्यता..
- प्रताप सरनाईक सर्वात मोठे भूमाफिया, भाजप आमदार नरेंद्र मेहता यांची पोलिसांत तक्रार
- शिवसेनेत गोऱ्हे – कडूंचा नावाला विरोध? एकनाथ शिंदेच्या पुढचा पेच वाढला…
- धर्माच्या भावनेने बघू नका, मराठी आलीच पाहिजे : इम्तियाज जलील यांचे मुस्लिम समाजाला आवाहन