विशेष प्रतिनिधी
पुणे : कोथरूड परिसरातील प्रस्तावित मेट्रो स्टेशन, बस डेपो आणि अर्धवट उड्डाणपूल यांच्या चुकीच्या नियोजनाविरोधात स्थानिक नागरिक आणि व्यापारी आक्रमक झाले असून “योग्य नियोजन करा, अन्यथा तीव्र आंदोलन” या मागणीसाठी मोठ्या प्रमाणावर सह्यांची मोहीम सुरू करण्यात आली आहे.
पौड रोड परिसरातील वाढती वाहतूक कोंडी, प्रदूषण आणि भविष्यात निर्माण होणाऱ्या गंभीर वाहतूक समस्यांबाबत नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. मेट्रो स्टेशन, बस डेपो आणि उड्डाणपूल यांचे समन्वयित नियोजन न झाल्यास कोथरूड परिसरातील वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.
स्थानिक नागरिक, व्यापारी, ज्येष्ठ नागरिक, महिला आणि युवकांनी एकत्र येत प्रशासनाविरोधात आवाज उठवण्यास सुरुवात केली आहे. यासाठी परिसरातील नागरिकांचा स्वतंत्र व्हॉट्सअॅप ग्रुप तयार करण्यात आला असून पुढील काही दिवस विविध भागांत सह्यांची मोहीम राबविण्यात येणार आहे.
या मोहिमेद्वारे प्रशासनासमोर काही प्रमुख मागण्या ठेवण्यात आल्या आहेत. त्यामध्ये मेट्रो स्टेशन, बस डेपो आणि उड्डाणपूल यांचे एकत्रित व शास्त्रीय वाहतूक नियोजन करणे, पौड रोडवरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पर्यायी उपाय जाहीर करणे, नागरिक व तज्ज्ञांसमोर अधिकृत प्रेझेंटेशन घेणे, स्थानिकांच्या सूचना व हरकती लेखी स्वरूपात स्वीकारणे आणि विकासकामांमुळे होणाऱ्या परिणामांचा सविस्तर अहवाल सार्वजनिक करणे यांचा समावेश आहे.
नागरिकांच्या भावना डावलून घाईघाईने निर्णय घेतल्यास व्यापक लोकआंदोलन उभारण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.
“विकास हवा, पण योग्य नियोजनासह” आणि “नागरिकांचा आवाज प्रशासनाने ऐकला पाहिजे” अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.
या मोहिमेत राहुल चव्हाण, निलेश सैंदाणे, विशाल अट्टल, अमित बोत्रे, अनिल चौधरी, विनोद मावाणी, ज्योती किरण पाटील, मोनीश ठाकूर आणि पार्थ सोनवणे सहभागी झाले आहेत.
Kothrud residents up in arms against metro, bus depot and flyover planning; signature campaign launched
महत्वाच्या बातम्या
- सुनेत्रा पवारांनी देशातील सर्वात मोठ्या मताधिक्याचा रेकॉर्ड मोडला
- सुनेत्रा पवारांनी मोडला अजितदादांचा 2024मधील विक्रम; १ लाख १२ हजार २६८ मतांनी आघाडीवर
- विजयचा दणका, स्टॅलिन यांच्यासह द्रमुक मंत्रिमंडळातील 32 पैकी 31 मंत्री पिछाडीवर
- बंगाल-आसाममध्ये भाजपची झेप; तामिळनाडूत थलपती विजयच्या पक्षाची ‘ब्लॉकबस्टर’ एन्ट्री, केरळमध्ये काँग्रेसला दिलासा