विशेष प्रतिनिधी
परभणी: शहरातील ठाकरे सेनेच्या ८० पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिल्यानंतर,आमदार राहुल पाटील यांनी पक्षावर नाराजी व्यक्त करणाऱ्या आणि पदाचे राजीनामे देणाऱ्या पदाधिकाऱ्यांविरोधात आक्रमक भूमिका घेतलेली पाहायला मिळत आहे.
मागील काही महिन्यांपासून परभणीचे खासदार संजय जाधव यांच्या पक्षांतराच्या चर्चांनी जोर धरला आहे.याच पार्श्वभूमीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी खासदार जाधवांचे समर्थक गंगाप्रसाद अनेराव यांची जिल्हाप्रमुख पदावरून उचलबांगडी केली होती.उद्धव ठाकरेंच्या कारवाईनंतर जिल्ह्यातील खासदार समर्थकांमध्ये मोठी खळबळ उडाली होती.
राहुल पाटील म्हणाले की, ‘ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष कार्यकर्ता निर्माण करणारा कारखाना आहे.आमच्या पक्षात किती आले आणि किती गेले,पक्षाला फरक पडत नाही.जेवढे आजपर्यंत गेले,त्यापेक्षा अधिक कार्यकर्ते तयार होतात.पक्षातील नाराजी ही फक्त चारभिंतीच्या आड व्यक्त केली पाहिजे.उघड नाराजी व्यक्त करणे हे पक्षाच्या शिस्तीत बसत नाही,त्यामुळे ज्यांच्याकडून शिस्त मोडण्यात येईल, त्यांच्यावर भविष्यात कारवाई केली जाईल,असा स्पष्ट इशारा आमदार राहुल पाटील यांनी दिला.
खासदार संजय जाधव हे पक्ष सोडणार की नाही? हे मी आत्ताच सांगू शकत नाही.सध्या ते आमच्यासोबत आहेत, भाजपा अजून किती लोकप्रतिनिधींना आपल्या पक्षात घेणार आहे याबद्दल माहिती नाही,आता त्याची गाडी फुल झाली आहे.एखाद्या पक्षात झालेली एवढी गर्दी चांगली नसते,असा टोला यावेळी त्यांनी भाजपला लगावला.
ठाकरे सेनेच्या जिल्हाप्रमुख पदी कोणाची निवड?
उद्धव ठाकरे यांनी खासदार संजय जाधवांचे खंदे समर्थक असलेल्या गंगाप्रसाद आणि राव यांचे जिल्हाप्रमुख पदावरून हाकालपट्टी केली.तर विष्णू मुरकुटे यांची नवनिर्वाचित जिल्हाप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.विष्णू मुरकुटे यांची जिल्ह्यातील ज्येष्ठ शिवसैनिक म्हणून ओळख आहे.यापूर्वी संघटनेत त्यांनी शाखाप्रमुख,शहरप्रमुख आणि तालुकाप्रमुख म्हणून जबाबदारी पाहिलेली आहे.
‘Action will be taken against those who break discipline’; Rahul Patil aggressive in Parbhani
महत्वाच्या बातम्या
- सुनेत्रा पवारांनी देशातील सर्वात मोठ्या मताधिक्याचा रेकॉर्ड मोडला
- सुनेत्रा पवारांनी मोडला अजितदादांचा 2024मधील विक्रम; १ लाख १२ हजार २६८ मतांनी आघाडीवर
- विजयचा दणका, स्टॅलिन यांच्यासह द्रमुक मंत्रिमंडळातील 32 पैकी 31 मंत्री पिछाडीवर
- बंगाल-आसाममध्ये भाजपची झेप; तामिळनाडूत थलपती विजयच्या पक्षाची ‘ब्लॉकबस्टर’ एन्ट्री, केरळमध्ये काँग्रेसला दिलासा