नाशिक : Nida Khan नाशिकमधील बहुचर्चित टीसीएस (‘TCS) कंपनीतील लैंगिक अत्याचार आणि बेकायदेशीर धर्मांतर प्रकरणी सर्वात महत्वाची अपडेट समोर आली आहे. या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी निदा खानला अटक करण्यात आली आहे. निदा खानला छत्रपती संभाजी नगरमधून अटक करण्यात आली आहे. तिच्याकडेच धर्मांतर घडवून आणण्याची महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. पण गेल्या काही दिवसांपासून निदा खान फरार होती. पोलीस तिचा राज्यभर शोध घेतला होता. अखेर तिला अटक करण्यात आली आहे. Nida Khan
निदा खान हिला छत्रपती संभाजीनगर मधून अटक करण्यात आली आहे. निदा खान नाशिकच्या टीसीएस प्रकरणातील फरार आरोपी होती. धार्मिक भावना दुखावणे आणि बलात्कार आणि लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपींना मदत करणे असे निदा खानवर आरोप करण्यात आले होते. गेल्या 20 दिवसांपासून निदा खानचा नाशिक पोलिसांकडून शोध सुरु होता. निदा खान हिने अटकपूर्व जामिनासाठीही प्रयत्न केला होता. पण अखेर पोलिसांनी अटक केली आहे. निदा खानला रात्री कोर्टात हजर करण्यात आलं आहे.
Key suspect Nida Khan arrested in TCS case
महत्वाच्या बातम्या
- सुनेत्रा पवारांनी देशातील सर्वात मोठ्या मताधिक्याचा रेकॉर्ड मोडला
- सुनेत्रा पवारांनी मोडला अजितदादांचा 2024मधील विक्रम; १ लाख १२ हजार २६८ मतांनी आघाडीवर
- विजयचा दणका, स्टॅलिन यांच्यासह द्रमुक मंत्रिमंडळातील 32 पैकी 31 मंत्री पिछाडीवर
- बंगाल-आसाममध्ये भाजपची झेप; तामिळनाडूत थलपती विजयच्या पक्षाची ‘ब्लॉकबस्टर’ एन्ट्री, केरळमध्ये काँग्रेसला दिलासा