विशेष प्रतिनिधी
पुणे: शहरात एकेकीकडे अल्पवयीन मुलींवर अत्याचाराच्या घटनांमुळे संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.पुण्यात मागच्या दोन दिवसात तब्बल सहा अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे.सलग घडणाऱ्या घटनांमुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
दरम्यान,बेपत्ता झालेल्या सर्व मुली १५ ते १७ वर्ष वयोगटातील आहेत.मुलींना फुस लावून पळवून नेण्यात आल्याचा संशय मुलींच्या पालकांनी व्यक्त केला आहे.याप्रकरणात शहरातील विविध भागांमधील पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले असून,पोलिसांकडून तपासाची चक्रे फिरवण्यात येत आहेत.
शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या नऱ्हे परिसरात धक्कादायक घटना घडली आहे.नऱ्हे परिसरातून एकाच वेळी दोन अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याची नोंद झाली आहे.मुलींच्या पालकांच्या तक्रारीनुसार, अज्ञात व्यक्तींकडून मुलींना फुस लावून पळवून नेण्याचा आरोप करण्यात आला आहे.
तसेच,वानवडी परिसरातून साडेसतरा वर्षांची मुलगी बेपत्ता झाली असून, तिच्या अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तर हडपसर परिसरातून १७ वर्षीय मुलीला अज्ञात व्यक्तीने पळून नेल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. शिवाय फुरसुंगी आणि वाघोली परिसरातून देखील मुली बेपत्ता झाल्याचा घटना समोर आल्या आहेत.
महत्वाचे म्हणजे, अल्पावधीत शहराच्या वेगवेगळ्या भागातून अशा प्रकारे सलग मुली बेपत्ता झाल्याने ह्यामागे रॅकेट ऍक्टिव्ह असल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय.
पुणे पोलिसांकडून या सर्व घटनांची गंभीर दखल घेत विशेष तपास पथके नियुक्त केली आहेत.बेपत्ता मुलींच्या शोध घेण्यासाठी मोबाईल लोकेशन, सीसीटीव्ही फुटेज याद्वारे तपास करण्यात येतोय.
6 minor girls go missing in Pune in two days; Women’s safety in the city is under threat…
महत्वाच्या बातम्या
- सुनेत्रा पवारांनी देशातील सर्वात मोठ्या मताधिक्याचा रेकॉर्ड मोडला
- सुनेत्रा पवारांनी मोडला अजितदादांचा 2024मधील विक्रम; १ लाख १२ हजार २६८ मतांनी आघाडीवर
- विजयचा दणका, स्टॅलिन यांच्यासह द्रमुक मंत्रिमंडळातील 32 पैकी 31 मंत्री पिछाडीवर
- बंगाल-आसाममध्ये भाजपची झेप; तामिळनाडूत थलपती विजयच्या पक्षाची ‘ब्लॉकबस्टर’ एन्ट्री, केरळमध्ये काँग्रेसला दिलासा