मुंबईतील कुटुंबाच्या मृत्यूबाबत धक्कादायक माहिती समोर; घरात उंदीर मारण्याचे औषध आढळले..

विशेष प्रतिनिधी

मुंबई: शहराच्या पायधूनी परिसरात एक संपूर्ण कुटुंबाचा संशयास्पद मृत्यू झाला होता.पायधुनीच्या घाटी मोहल्ल्यातील मोगल उमरेटी नावाच्या मोठ्या इमारतीमध्ये ही धक्कादायक घटना घडली होती.अब्दुल्ला डोकडिया,नसरीन डोकडिया, आयेशा डोकडिया आणि जैनब डोकडिया यांचा मृत्यू झाला होता.घरातील पाहुण्यांसोबत बिर्याणी खाल्ल्यानंतर कलिंगड देखील खाल्ल्याने त्यांना जुलाब आणि उलट्या होऊन डोकडिया कुटुंबाचा मृत्यू झाला होता.कलिंगडातून विषबाधा झाल्याचा संशय सुरुवातीला व्यक्त करण्यात आला होता.मात्र नुकत्याच आलेल्या फॉरेन्सिक अहवालातून यांचा मृत्यू कलिंगड किव्वा बिर्याणीमुळे नव्हे तर विषारी पदार्थामुळे झाल्याचे निष्पन्न झाले आहे. मृत्यू झालेल्या चौघांचा शरीरात झिंक फोस्फाईड आढळून आले,झिंक फॉस्फाईड हे उंदीर मारण्याचे औषध आहे.



घरात सापडल्या संशयास्पद वस्तू..

डोकाडिया कुटुंबाच्या मृत्यसंदर्भात धक्कादायक माहिती समोर आली आहे. डोकाडिया कुटुंब राहत असलेल्या घरात उंदीर मारण्याचे औषध आढळून आले आहे. डोकाडिया यांच्या घरातून उंदीर मारण्यासाठी वापरण्यात येणार स्प्रे आणि औषधाच्या वड्या आढळून आल्या आहेत.

हे औषध डोकाडिया कुटुंबाच्या शरीरात कसे गेले, हे मात्र अद्याप कळू शकलेले नाही. त्यामुळे हा घातपात असावा की आत्महत्या अशी चर्चाही रंगली आहे. अब्दुल्ला आणि आयेशा यांचा रुग्णालयात मृत्यूपूर्वी जबाब नोंदवून घेण्यात आला होता.यावेळी त्या दोघांनीही आम्ही बिर्याणी खाल्ल्यानंतर कलिंगड खाल्ले होतेच सांगितले.आत्महत्या किव्वा किव्वा संशय व्यक्त करणारी कोणतीही माहिती त्यांचा जबाबातून समोर आली नव्हती.

Shocking information comes to light regarding the death of a family in Mumbai; Rat poison was found in the house.

 

महत्वाच्या बातम्या