विशेष प्रतिनिधी
पुणे: Pune गेल्या १५ एप्रिलपासून रखडलेल्या पुणे जिल्ह्यातील रेडी मिक्स काँक्रीट (RMC) प्रकल्पांचा पेच अखेर सुटला आहे. ‘एकसमान नियमावली’च्या मागणीसाठी बंद असलेले जिल्ह्यातील ३५० हून अधिक प्रकल्प येत्या शनिवारपासून पुन्हा कार्यान्वित होणार आहेत. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत यावर सकारात्मक तोडगा काढण्यात आला.Pune
प्रशासकीय यंत्रणांकडून ‘ग्रीन सिग्नल’
पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील आरएमसी प्रकल्पांबाबत निर्माण झालेला नियमावलीचा गोंधळ दूर करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात ही बैठक पार पडली. यावेळी महापालिका आयुक्त नवल किशोर राम, पीएमआरडीए, प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि पोलीस दलाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. आरएमसी चालकांनी मांडलेल्या अडचणींवर सर्वच विभागांनी सकारात्मक भूमिका घेत एकसमान ‘SOP’ तयार करण्याचे मान्य केले आहे.Pune
वाहतुकीचे नवे नियम आणि अटी
काँक्रीट ही नाशवंत वस्तू असल्याने वाहतुकीसाठी वाढीव वेळ देण्याची मागणी मान्य करण्यात आली आहे. शिवाय बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय देखील ठरलेले आहे.
वाहतुकीची वेळ – बुधवार, शनिवार आणि रविवार या तीन दिवशी वाहतुकीला पूर्ण मुभा असेल. तर उर्वरित चार दिवस सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेतच वाहने रस्त्यावर धावू शकतील.
प्रदूषणमुक्त ‘कोअर झोन’- पुढील ६ महिन्यांत दोन्ही शहरांसाठी प्रदूषणमुक्त झोन निश्चित केले जाणार आहेत.
शिस्त व सुरक्षा-आरएमसी वाहनांवर स्पष्ट नामपट्टिका असणे आणि कॅमेरे बसवणे अनिवार्य असेल. येत्या तीन आठवड्यांत सर्व यंत्रणा मिळून एक संयुक्त नियमावली (SOP) प्रसिद्ध करणार आहेत.
जिल्हाधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत आमच्या मागण्यांवर सकारात्मक तोडगा निघाला आहे. शुक्रवारी आम्हाला प्रशासनाकडून अधिकृत नियमावली मिळेल, त्यानंतर शनिवारपासून सर्व प्रकल्प पुन्हा सुरू होतील. असे मत प्रदीप वाल्हेकर, अध्यक्ष, पुणे आरएमसी असोसिएशन यांनी व्यक्त केला आहे.
बांधकाम क्षेत्राला मोठा दिलासा!
गेल्या २५ दिवसांपासून आरएमसी प्रकल्प बंद असल्याने पुणे मेट्रो, उड्डाणपूल आणि जवळपास १५०० गृहनिर्माण प्रकल्पांचे काम ठप्प झाले होते. यामुळे कोट्यवधी रुपयांची उलाढाल थांबली होती. आता प्रकल्प सुरू होणार असल्याने रखडलेल्या कामांना पुन्हा गती मिळणार आहे. पुणे जिल्ह्यातील या उद्योगावर सुमारे ४० हजार कामगारांचा रोजगार अवलंबून असून, दरमहा ४५० कोटींची उलाढाल या क्षेत्रातून होते.
Pune: Strike Over for 350+ RMC Plants; Operations to Resume This Saturday After Collector’s Interventio
महत्वाच्या बातम्या
- सुनेत्रा पवारांनी देशातील सर्वात मोठ्या मताधिक्याचा रेकॉर्ड मोडला
- सुनेत्रा पवारांनी मोडला अजितदादांचा 2024मधील विक्रम; १ लाख १२ हजार २६८ मतांनी आघाडीवर
- विजयचा दणका, स्टॅलिन यांच्यासह द्रमुक मंत्रिमंडळातील 32 पैकी 31 मंत्री पिछाडीवर
- बंगाल-आसाममध्ये भाजपची झेप; तामिळनाडूत थलपती विजयच्या पक्षाची ‘ब्लॉकबस्टर’ एन्ट्री, केरळमध्ये काँग्रेसला दिलासा