विशेष प्रतिनिधी
पुणे : Woman lies पुणे विभागातील पाटस रेल्वे स्थानकावर पादचारी पुलाची अपुरी व्यवस्था प्रवाशांच्या जीवावर बेतत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. आज सकाळी रेल्वे रुळ ओलांडताना एका महिलेचा जीव थोडक्यात बचावला. मालगाडी अचानक समोर आल्याने महिलेने प्रसंगावधान राखत थेट ट्रॅकवर झोपून स्वतःचा जीव वाचवला. हा संपूर्ण थरारक प्रकार परिसरातील नागरिकांच्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाला असून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.Woman lies
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिला पाटस रेल्वे स्थानकावरील एका प्लॅटफॉर्मवरून दुसऱ्या बाजूस जाण्यासाठी रेल्वे रुळ ओलांडत होती. याच वेळी अचानक मालगाडीला सिग्नल मिळाल्याने गाडी वेगाने पुढे सरकू लागली. काही क्षणातच गाडी अगदी जवळ आल्याचे लक्षात येताच महिलेने धाडस आणि प्रसंगावधान दाखवत रुळांच्या मधोमध झोपण्याचा निर्णय घेतला. मालगाडी तिच्या अंगावरून गेल्यानंतर ती सुरक्षित बाहेर आली. या घटनेमुळे स्थानक परिसरात एकच खळबळ उडाली.Woman lies
स्थानिक नागरिकांनी सांगितले की, पूर्वी प्लॅटफॉर्म क्रमांक १ वरून २ वर जाण्यासाठी कोणताही पादचारी पूल नव्हता. त्यामुळे प्रवाशांना अनेकदा मालगाड्या किंवा प्रवासी गाड्यांच्या मधून अथवा खाली वाकून जीव धोक्यात घालून मार्ग काढावा लागत होता. नागरिकांच्या सातत्यपूर्ण मागणीनंतर रेल्वे प्रशासनाने प्लॅटफॉर्म १ ते २ दरम्यान पादचारी पूल उभारला. मात्र, प्लॅटफॉर्म क्रमांक २ च्या पुढे असलेल्या दोन अतिरिक्त रेल्वे रुळांवरून जाण्यासाठी आजही कोणतीही सुविधा उपलब्ध नाही.
या रुळांवरून सतत मालगाड्यांची ये-जा सुरू असते. त्यामुळे नागरिक, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांना अजूनही जीव मुठीत धरून रुळ ओलांडावे लागत आहेत. आजची घटना ही रेल्वे प्रशासनाच्या दुर्लक्षाचे गंभीर उदाहरण असल्याची प्रतिक्रिया स्थानिकांकडून व्यक्त केली जात आहे.
“एखादी मोठी दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासन जागे होणार का?” असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित करत तातडीने संपूर्ण स्थानकावर सुरक्षित पादचारी पूल उभारण्याची मागणी केली आहे.
Woman lies flat on tracks, survives after spotting approaching goods train
महत्वाच्या बातम्या
- सुनेत्रा पवारांनी देशातील सर्वात मोठ्या मताधिक्याचा रेकॉर्ड मोडला
- सुनेत्रा पवारांनी मोडला अजितदादांचा 2024मधील विक्रम; १ लाख १२ हजार २६८ मतांनी आघाडीवर
- विजयचा दणका, स्टॅलिन यांच्यासह द्रमुक मंत्रिमंडळातील 32 पैकी 31 मंत्री पिछाडीवर
- बंगाल-आसाममध्ये भाजपची झेप; तामिळनाडूत थलपती विजयच्या पक्षाची ‘ब्लॉकबस्टर’ एन्ट्री, केरळमध्ये काँग्रेसला दिलासा