Harshvardhan Sapkal : नाशिकच्या टीसीएस प्रकरणावरून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा भाजपाचा डाव, एफआयआर सार्वजिनक करण्याची हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Harshvardhan Sapkalनाशिकच्या टीसीएस प्रकरणी निदा खान अटक प्रकरणातील एफआयआर अद्याप सार्वजनिक केलेला नाही तो सार्वजनिक करावा. कायद्याने त्यांचे काम करावे पण या प्रकरणाच्या माध्यमातून धार्मिक धृवीकरण करण्याचा खेळ भारतीय जनता पक्ष करत आहे. एवढे दिवस पोलीस झोपा काढत होते का, याचे उत्तर द्यावे. या प्रकरणाला हवा देण्यात सरकारचा काही हात आहे का, हे उघड झाले पाहिजे, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.Harshvardhan Sapkal



राष्ट्रवादी काँग्रेसचे (श.प.) प्रवक्ते विकास लवंडे यांच्यावरील शाईहल्ला, धक्काबुक्की व शिवीगाळ हा भ्याड हल्ला असून हल्लेखोर वारकरी संप्रदायाच्या विचाराला माननारे नाहीत. या प्रकरणाला भाजपाची चिथावणी असून अशा हल्लेखोरांना भाजपा सरकार संरक्षण देत आले आहे. विकास लवंडे यांच्यावरील हल्ला हा वारकरी संप्रदायाचा अपमान आहे, या हल्लेखोरांवर कठोर कारवाई करा, अशी मागणीही गांधी भवन येथे प्रसार माध्यमांशी बोलताना सपकाळ यांनी केली. ते म्हणाले की, विकास लवांडे यांच्यावरील हल्ल्याचा काँग्रेस पक्ष तीव्र शब्दात निषेध करत आहे. विकास लवांडे हे वारकरी संप्रदायाचा समता, बुंधता व सामाजिक न्यायाचा विचार पुढे घेऊन जाणारे आहेत. वारकरी संप्रदायात मनुवादी विचार वाढत आहे, ही चिंता त्यांनी व्यक्त केली होती, ती या हल्ल्याने खरी करून दाखवली आहे. मूठभर लोकांच्या हाती धर्मसत्ता व राजसत्ता असावी या विचाराचा मोठा फटका छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर व अनेक साधू संतांनाही बसला आहे. संत तुकाराम महाराजांच्या गाथा बुडवणारे, संत ज्ञानेश्वर यांना छळणारे, सावित्रिबाई फुले यांना छळणारा विचार हाच आहे. या मनुवादी विचाराला कंटाळून गौतम बुद्धांनी बौद्ध धर्माची स्थापना केली, महाविरांनी जैन धर्माची स्थापना केली,हीच परंपरा महात्मा बसवेश्वर पुढे घेऊन गेले. हा मनुवादी विचार भाजपा व रा. स्व. संघाचा आहे, याच विचाराने दाभोळकर, पानसरे, कलबुर्गी यांनाही छळले आहे.

विधान परिषद निवडणुकीत बिनविरोध निवडून आलेले महाविकास आघाडीचे उमेदवार, शिवसेना नेते अंबादास दानवे आणि आमदार मिलिंद नार्वेकर यांनी आज गांधी भवन येथे भेट घेऊन काँग्रेस पक्षाने दिलेल्या पाठिंब्याबद्दल आभार मानले. यावेळी महाविकास आघाडीच्या आगामी काळातील राजकीय वाटचालीबाबत सविस्तर आणि सकारात्मक चर्चा झाली. राज्यातील लोकविरोधी तसेच संविधान आणि लोकशाहीविरोधी भाजप-महायुती सरकारच्या धोरणांविरोधात महाविकास आघाडी एकजुटीने आणि खंबीरपणे संघर्ष करत राहील, असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

Harshvardhan Sapkal alleges BJP using Nashik TCS case to fuel communal divide, seeks FIR disclosure

महत्वाच्या बातम्या