भोंदू अशोक खरात प्रकरणात रूपाली चाकणकर यांची एसआयटीसमोर चौकशी

विशेष प्रतिनिधी

पुणे: राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर आज नाशिकमधील विशेष तपास पथकासमोर चौकशीसाठी हजर राहणार आहेत. शेकडो महिलांच्या लैंगिक शोषणाचा आरोप असलेल्या या प्रकरणाची सखोल चौकशी होणार आहे.

रूपाली चाकणकर म्हणाल्या, खरात प्रकरणी जो काही तपास सुरू आहे त्याच्या संदर्भात त्यांचे काही प्रश्न असतील ते देण्यासाठी मी आलेली आहे. या तपासात पूर्णपणे माझे सहकार्य राहील. त्यामुळे यात जे काही प्रश्न असतील त्या सगळ्यांची उत्तरे देण्याचा मी प्रयत्न करणार आहे. अनेक शंका तुमच्या सगळ्यांच्या मनात आहेत. जेव्हा हा तपास पूर्ण होईल, त्या तपासातूनच तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळणार आहे.



मुख्य आरोपी अशोक खरातसोबतचे काही फोटो समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर रुपाली चाकणकर यांच्यावर विरोधकांनी गंभीर आरोप केले होते. चाकणकर या खरातला आपला ‘गुरू’ मानत असल्याने त्यांनी यापूर्वीच्या काही प्रकरणांत राजकीय हस्तक्षेप केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची आक्रमक मागणी लावून धरली होती.

शिर्डी जमीन व्यवहार फसवणूक प्रकरणात, भोंदू अशोक खरात याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. त्याला कडेकोट बंदोबस्तात काल राहाता न्यायालयात हजर करण्यात आले होते. शिर्डी पोलिसांनी पुढील तपासासाठी त्याला पोलीस कोठडी देण्याची विनंती केली होती. शिर्डीसह आसपासच्या शिवारात भोंदू खरातने आर्थिक फसवणूक करून अनेक शेतकऱ्यांच्या जमीन लाटल्याचे समोर आले आहे.

Rupali Chakankar questioned by SIT in fake godman Ashok Kharat case

महत्वाच्या बातम्या