BMC announces : मुंबईकरांवर पाणी कपातीचे संकट 15 मे पासून दहा टक्के पाणी कपात

विशेष प्रतिनिधी

मुंबई : BMC announces मुंबई महानगराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांमधील पाणीसाठ्यात घट झाल्याने हा पाणीसाठा अधिकाधिक काळ उपयोगात यावा यादृष्टीने खबरदारीचा उपाय तसेच भारतीय हवामान खात्याने पुढील वर्षी येणाऱ्या अल निनो व आयओडी बाबत वर्तवलेला अंदाजानुसार कमी मान्सून प्रमाण लक्षात घेता जलसंपदा विभाग महाराष्ट्र शासन यांच्या निर्देशानुसार मुंबई महानगरात येत्या 15 मे 2026 पासून 10 टक्के पाणीकपात लागू करण्याचा निर्णय बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने घेतला आहे. मुंबईकर नागरिकांनी घाबरून जाण्याचे कोणतेही कारण नाही. मात्र सर्व नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे विनम्र आवाहन देखील बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.BMC announces



मुंबईस पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांमध्ये आजची आकडेवारी लक्षात घेत एकूण 3 लाख 40 हजार 399 दशलक्ष लीटर पाणीसाठा उपलब्ध आहे. वार्षिक 14 लाख 47 हजार 363 दशलक्ष लीटरच्या तुलनेत सध्या 23.52 टक्के इतकाच उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. पाणीसाठ्यावर महानगरपालिका प्रशासनाचे अत्यंत बारकाईने लक्ष असून दररोज नियोजनपूर्वक पाणीपुरवठा केला जात आहे. एवढेच नव्हे तर, भातसा धरणातील निभावणी साठ्यातून 1,47,092 दशलक्ष लीटर तर अप्पर वैतरणा धरणातील निभावणी साठ्यातून 90,000 दशलक्ष लीटर अतिरिक्त पाणीसाठा मुंबईला मिळणार आहे.

मुंबईसाठी पाणीसाठा उपलब्ध असून मुंबईकर नागरिकांनी घाबरून जाण्याची आवश्यकता नाही. अलीकडे वाढलेले तापमान, पर्यायाने वाढणारे बाष्पीभवन आणि पाणीसाठा 10 टक्केपेक्षा कमी झाल्यानंतर यापुढेही पाणीपुरवठा नियोजनपूर्वक करता यावा, या सर्व पैलूंचा विचार करून आणि खबरदारीचा उपाय म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने 10 टक्‍के पाणी कपात लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने ठाणे, भिवंडी-निजामपूर महानगरपालिका व इतर गावांना जो पाणीपुरवठा केला जातो, त्यात देखील 15 मे 2026 पासून 10 टक्के पाणीकपात लागू राहणार आहे. समाधानकारक पर्जन्यमान होऊन जलाशयांमधील उपयुक्त साठ्यामध्ये सुधारणा होईपर्यंत ही पाणी कपात लागू राहणार आहे.

Mumbai faces water cut from May 15  BMC announces 10% supply reduction amid falling reservoir levels and weak rainfall forecast

महत्वाच्या बातम्या