विशेष प्रतिनिधी
मुंबई : NEET Paper नीट-यूजी 2026 पेपरफुटी प्रकरणातील आरोपी शुभम खैरनारला मुंबईतील एस्प्लेनेड न्यायालयानं दोन दिवसांचा ट्रान्झिट रिमांड मंजूर केला आहे. बुधवारी सकाळी सीबीआयनं खैरनारला न्यायालयात हजर केलं. सुनावणीनंतर न्यायालयानं त्याला पुढील चौकशीसाठी दिल्लीला नेण्यास परवानगी दिली. आता सीबीआयचे पथक आज सायंकाळी त्याला दिल्लीला घेऊन जाणार आहे. त्याला गुरुवारी दिल्लीतील विशेष सीबीआय न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.NEET Paper
एस्प्लेनेड न्यायालयातील सुनावणीदरम्यान सीबीआयनं न्यायालयाला सांगितले की, नीट पेपरफुटी प्रकरणात आणखी अनेक आरोपी सहभागी असल्याची शक्यता आहे. संपूर्ण रॅकेटचा पर्दाफाश करण्यासाठी तसेच इतर आरोपींचा शोध घेण्यासाठी खैरनारची कोठडी आवश्यक असल्याचं तपास यंत्रणेनं स्पष्ट केलं. या युक्तिवादानंतर न्यायालयानं सीबीआयची मागणी मान्य करत दोन दिवसांचा ट्रान्झिट रिमांड मंजूर केला.NEET Paper
शुभम खैरनार हा नाशिक जिल्ह्यातील नांदगाव परिसरातील रहिवासी आहे. त्याला मंगळवारी नाशिक गुन्हे शाखेनं ताब्यात घेतलं होतं. राजस्थान पोलिसांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर प्रकरणाचा तपास सीबीआयकडे वर्ग करण्यात आल्यानंतर केंद्रीय तपास यंत्रणेनं त्याला ताब्यात घेतलं.
दरम्यान, नीट-यूजी 2026 परीक्षा पेपरफुटीच्या आरोपांमुळे केंद्र सरकारनं परीक्षा रद्द केली आहे. 3 मे रोजी झालेल्या या परीक्षेसाठी देशभरातील सुमारे 23 लाख विद्यार्थी बसले होते. राष्ट्रीय परीक्षा एजन्सीच्या प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्यानंतर केंद्र सरकारनं सीबीआय चौकशीचे आदेश दिले आहेत. या प्रकरणी सीबीआयनं देशभरात विविध राज्यांमध्ये तपास सुरू केला आहे. त्यानुसार अनेक संशयितांची चौकशी करण्यात येत आहे.
तपास यंत्रणांच्या प्राथमिक चौकशीत महाराष्ट्र, राजस्थान, बिहार, हरियाणा आणि इतर काही राज्यांमध्ये पसरलेले मोठे नेटवर्क समोर आल्याची माहिती आहे. काही संशयितांकडून इलेक्ट्रॉनिक पुरावे, प्रवेशपत्रे आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. सोशल मीडिया आणि मेसेजिंग अॅपच्या माध्यमातून प्रश्नपत्रिका लीक झाल्याचा संशय तपास यंत्रणांनी व्यक्त केला आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे देशभरातील लाखो विद्यार्थ्यांमध्ये संतापाचं वातावरण निर्माण झालं असून दोषींवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.
NEET Paper Leak Suspect Shubham Khairnar to Be Taken to Delhi for CBI Probe; Mumbai Court Grants Two-Day Transit Remand
महत्वाच्या बातम्या
- १०५ दिवसांत मराठी शिका, अन्यथा १६ ऑगस्टपासून कारवाई; परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांचा इशारा
- काँग्रेसने द्रमुकच्या पाठीत खंजीर खुपसला; तमिळनाडूतील सत्तांतरावर मोदींचा हल्लाबोल
- अशोक खरात प्रकरणात चार मंत्र्यांवर गंभीर आरोप, नाना पटोलेंची मंत्रिमंडळातून हकालपट्टीची मागणी
- भोंदू अशोक खरात प्रकरणात रूपाली चाकणकर यांची एसआयटीसमोर चौकशी