विशेष प्रतिनिधी
मुंबई : MI Intelligence महाराष्ट्र सरकारने मुंबई क्षेत्रात एकात्मिक ग्रीन डाटा सेंटर पार्क आणि ‘एआय कॉम्प्युट हब’ स्थापन करण्यासाठी ‘एमआय इंटेलिजन्स लॅब्ज प्रायव्हेट लिमिटेड’ कंपनीसोबत १ लाख १४ हजार कोटी रुपयांच्या प्रस्तावित गुंतवणुकीचा सामंजस्य करार केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.MI Intelligence
नूतनीकरणक्षम ऊर्जेवर आधारित असलेल्या या प्रकल्पामुळे उच्च तंत्रज्ञान क्षेत्रात सुमारे ८ हजार प्रत्यक्ष आणि अनेक अप्रत्यक्ष नोकऱ्या निर्माण होण्याची अपेक्षा आहे. इंजिनिअर्स, डाटा सायंटिस्ट आणि ऑपरेशन्स कर्मचाऱ्यांना मोठी संधी मिळणार आहे. तसेच बांधकाम कालावधीत सुमारे २ हजार अतिरिक्त रोजगार संधी निर्माण होतील, अशी माहिती देण्यात आली.MI Intelligence
हा प्रकल्प महाराष्ट्राच्या ‘माहिती तंत्रज्ञान धोरण २०२३’ आणि ‘ग्रीन इंटिग्रेटेड डाटा सेंटर पार्क धोरण २०२४’अंतर्गत विकसित केला जाईल. या उपक्रमामुळे महाराष्ट्राला कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात एआय आणि डिजिटल पायाभूत सुविधांमध्ये राष्ट्रीय तसेच जागतिक स्तरावर आघाडीचे स्थान मिळवून देणे हे सरकारचे मुख्य ध्येय आहे.
Maharashtra signs Rs 1.14 lakh crore deal with MI Intelligence Labs; Mumbai to get biggest Al compute centre, 8,000 jobs expected
महत्वाच्या बातम्या