विशेष प्रतिनिधी
मुंबई :Bajrang Dal मुंबईतील अंधेरी पूर्व येथील के-ईस्ट वॉर्ड कार्यालयाबाहेर विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या वतीने आक्रोश आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात मोठ्या संख्येने बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषद कार्यकर्ते सहभागी झाले होते.Bajrang Dal
कार्यकर्त्यांनी हातात विविध घोषणांचे पोस्टर घेत लव्ह जिहाद, लँड जिहाद, अवैध बांग्लादेशी घुसखोरी, ड्रग्जमुक्त समाज आणि अवैध धार्मिक बांधकाम या मुद्द्यांवर आंदोलन छेडले. आयोजकांनी सनातन समाजाला मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले होते, त्यानंतर नागरिकांचीही मोठी उपस्थिती पाहायला मिळाली.Bajrang Dal
संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी समाज आणि युवकांना नशा, गुन्हेगारी तसेच अवैध कृत्यांपासून मुक्त करण्याच्या उद्देशाने हे जनआंदोलन असल्याचे सांगितले. आंदोलनादरम्यान “हिंदू एकत्र येतील, इतिहास घडवतील” अशा घोषणांद्वारे समाजाला एकजूट राहण्याचे आवाहन करण्यात आले.
यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली असून विविध पदाधिकाऱ्यांनी भाषणातून आपली भूमिका मांडली.
VHP and Bajrang Dal stage protest agitation in Andheri
महत्वाच्या बातम्या