एका प्राध्यापकाचा लढा.. नीट पेपरफुटीचा असा झाला भांडाफाेड!

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : गेस पेपरच्या नावाखाली फाेडलेला पेपर, त्यामुळे एका प्राध्यापकाला आलेला संशय आणि त्यांनी दिलेला लढा यामुळे देशभरात खळबळ माजविणाऱ्या नीट पेपरफुटीचा भांडाफाेड झाला

राजस्थानातील सिकर येथील शशिकांत सुथार गेल्या १२ वर्षांपासून रसायनशास्त्र विषय शिकवतात. गेल्या ३ वर्षांपासून सिकरच्या गुरुकृपा इन्स्टिट्यूटमध्ये ते नीटची तयारी करुन घेतात. पेपर फुटल्याचा संशय आल्यावर त्यांनीच पहिली तक्रार त्यांनीच केली होती.

शशिकांत सुधार यांना पहिला संशय परीक्षा झाल्याच्या दिवशीच ३ मे रोजी आला. पेपर झाल्यावर नेहमीच्या सवयीने त्यांनी प्रश्नपत्रिकेचे विश्लेषण केले. त्यानंतर ते घरी आल्यावर शिक्षक असलेल्या त्यांच्या घरमालकांनी मला एक व्हायरल पीडीएफ दाखवली. त्यात रसायनशास्त्राचे १०४ प्रश्न होते. त्याला ‘गेस’ पेपर म्हटले होते. त्यातील ४५ प्रश्न जसेच्या तसे नीटच्या प्रश्नपत्रिकेत होते. १२ वर्षांपासून रसायनशास्त्र शिकवित असलेल्या सिकर यांना पूर्ण माहित हाेत की इतका अचूक अंदाज कुणालाच वर्तवता येत नाही.



त्यामुळे या सगळ्याच्या मुळशी जाण्याचे त्यांनी ठरविले. केवळ रसायनशास्त्रच नव्हे तर जीवशास्त्राबाबततही हाच प्रकार घडल्याचे त्यांना दिसले. घरमालकाने त्यांन दुसरी जीवशास्त्राची पीडीएफ दाखवली. त्यामध्ये ३०० प्रश्न होते. जीवशास्त्र शिकवणाऱ्या शिक्षक मित्राला त्यांनी पीडीएफ पाठवली. त्यानेही जीवशास्त्राचे बहुतांश प्रश्न जसेच्या तसेच आल्याचे सांगितले. मग मात्र प्रश्नपत्रिका फुटल्याची खात्री झाली.

मी, घरमालक व मित्र आम्ही सर्वांनी ३ मे रोजीच रात्री थेट स्थानिक पोलिस ठाणे गाठून याची माहिती दिली. पण, या दोन व्हायरल पीडीएफ शिवाय आमच्याकडे काहीच पुरावे नव्हते. गुन्हा नोंद करायचा तर तसे पुरावे हवेत असे पोलिसांनी सांगितले.आम्ही वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना भेटलो. त्यांनी आम्हाला काही सूचना केल्या थेट एनटीएकडे तक्रारीसाठीचा सल्ला दिला. ३ मे नंतर ७ मे पर्यंत मित्रांसोबत पेपर फुटल्येच पुरावे ते जमवत हाेते. त्यानंतर ७ मे रोजी एनटीए, सीबीआय, शिक्षण मंत्रालयाला मेल पाठवला.

त्यांनी तक्रार केल्यावर तत्काळ प्रतिसाद मिळाला. सीबीआय, राजस्थान एसओजी, एनटीए यांच्याकडून फोन आले. सीबीआयाचे पथक दिल्लीहून लगेच आले. त्यांच्याशी चर्चा केली आणि जबाब नोंदवले. २२ लाख विद्यार्थी जीव तोडून मेहनत करतात. त्यांच्या स्वप्नांशी खेळण्याचे काम झाले होते. त्या विद्यार्थ्यांची प्रेरणा घेऊनची मी तक्रार केली. त्यामुळे हे सगळं करताना भीती वाटली नाही, असेही सुधार सांगतात.

A professor’s fight… A neat paper cut turned into a disaster!

 

महत्वाच्या बातम्या