Ramdas Kadam : ‘मातोश्रीपासून सांभाळून राहा’; अमित ठाकरेंना शुभेच्छा देताना रामदास कदमांचा टोला

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Ramdas Kadam  शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी मनसे नेते अमित ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना ठाकरे कुटुंबावर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. “अमितजींनी ‘मातोश्री’पासून जरा सांभाळून राहावे,” असा खोचक सल्ला देत त्यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य यांच्यावर टीका केली.Ramdas Kadam

अमित ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त बोलताना कदम म्हणाले, “अमितजींना मी खूप-खूप शुभेच्छा देतो. पण त्यांनी ‘मातोश्री’पासून जरा सांभाळून राहावे. आज आदित्य ठाकरे तुम्हाला शुभेच्छा द्यायला आले आहेत, भाऊ म्हणून शुभेच्छा दिल्या. पण हा भाऊ किती दिवस टिकेल हे पहावे लागेल.”Ramdas Kadam

यावेळी त्यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्ष टीका करत, “आदित्य ठाकरे निवडून आले, पण तुम्हाला त्यांनी पाडले. ‘मातोश्री’चे तुमच्यावर खूप प्रेम आहे,” असा उपरोधिक टोला लगावला.Ramdas Kadam



दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्यावर विरोधकांकडून सुरू असलेल्या चर्चेलाही कदम यांनी उत्तर दिले. “सत्ता चालवायची असेल तर दिल्लीला जावेच लागते. शेतकरी, कष्टकरी आणि उद्योजकांचे प्रश्न सोडवण्यासाठी निधी आणि निर्णयांसाठी दिल्ली गाठावी लागते,” असे ते म्हणाले.

“मला माझ्या नेत्याचा अभिमान आहे. ते उत्कृष्ट काम करत आहेत. मराठी माणसाला ठेच लागेल असे कोणतेही काम ते करत नाहीत. ‘एकनाथजी आप आगे बढो, हम सब आपके साथ है’,” असे म्हणत कदम यांनी शिंदे यांचे कौतुक केले.

दरम्यान, गिरीष महाजन यांनीही शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्याबाबत प्रतिक्रिया दिली. “एकनाथ शिंदे नेहमीच दिल्लीला जात असतात. त्यांची काही खाजगी कामे असू शकतात. विधान परिषदेच्या जागावाटपासाठीच ते दिल्लीला गेले आहेत असे मानण्याचे कारण नाही,” असे महाजन म्हणाले.

मुख्यमंत्री, एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार हे एकत्र बसून योग्य निर्णय घेतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

‘Stay cautious of Matoshree’: Ramdas Kadam’s swipe at Thackerays while wishing Amit Thackeray

महत्वाच्या बातम्या