विशेष प्रतिनिधी
मुंबई : Mangal Prabhat Lodha नेस्को येथे ड्रग्सच्या सेवनामुळे घडलेल्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने नशा मुक्ती अभियान अधिक तीव्र करण्याचा निर्णय घेतला असून, कॅबिनेट मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे सहपालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या अध्यक्षतेखाली आज उच्चस्तरीय समितीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.Mangal Prabhat Lodha
महाराष्ट्र दिनानिमित्त मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात संपूर्ण वर्षभर नशा मुक्ती अभियान राबवले जाईल, अशी घोषणा केली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मान्यतेनंतर गृह विभागाने यासंदर्भातील शासन निर्णय जारी करून उच्चस्तरीय समितीची स्थापना केली असून, या समितीचे अध्यक्षपद मंगलप्रभात लोढा यांच्याकडे सोपविण्यात आले आहे. आजची बैठक ही या समितीची पहिली अधिकृत बैठक होती.Mangal Prabhat Lodha
बैठकीत नशा मुक्ती अभियान अधिक प्रभावी आणि व्यापक स्वरूपात राबविण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. २६ जून रोजी साजऱ्या होणाऱ्या जागतिक अमली पदार्थ विरोधी दिनाचे औचित्य साधून मोठ्या प्रमाणावर जनजागृती मोहीम राबविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत शाळा, महाविद्यालये, गृहनिर्माण संस्था, व्यायामशाळा, स्पोर्ट्स क्लब तसेच महानगरपालिकेच्या प्रभाग कार्यालयांमध्ये एकाच वेळी ऑनलाइन कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत.
या मोहिमेअंतर्गत वर्षभर विविध उपक्रम राबवले जाणार असून त्यासाठी मासिक वेळापत्रकही तयार करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांमध्ये आणि युवकांमध्ये जनजागृती करण्यासाठी पोस्टर्स, शॉर्ट फिल्म्स, पथनाट्य, जिंगल्स, गाणी तसेच विविध स्पर्धांचे आयोजन केले जाणार आहे.
या अभियानात महानगरपालिका, महिला व बाल विकास विभाग, शिक्षण विभाग, पोलीस प्रशासन तसेच इतर शासकीय विभागांचा सक्रिय सहभाग असणार आहे.
यावेळी मंगलप्रभात लोढा म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यात नशा मुक्ती अभियान प्रभावीपणे राबवले जात आहे. “२६ जून हा केवळ एक दिवस नसून समाजाला योग्य दिशेने नेण्याची जबाबदारी लक्षात आणून देणारा महत्त्वाचा क्षण आहे. विशेषतः युवकांमध्ये वाढत्या व्यसनाधीनतेच्या पार्श्वभूमीवर शासन आणि समाजाने एकत्र येत नशामुक्तीचा संदेश घराघरात पोहोचवणे अत्यावश्यक आहे,” असे त्यांनी सांगितले.
या बैठकीस मुंबई शहर जिल्हाधिकारी आंचल गोयल, मुंबई उपनगर जिल्हाधिकारी सौरभ कटियार तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
Mumbai to launch year-long anti-drug campaign after NESCO incident; high-level panel holds first meeting
महत्वाच्या बातम्या
- High Court : जनावरांच्या कत्तल निर्बंधांवर स्थगिती देण्यास उच्च न्यायालयाचा नकार
- Rohit Pawar : “भाजपसोबत जाणार नाही”; रोहित पवारांच्या विधानाने राष्ट्रवादीत नव्या चर्चांना उधाण
- ‘नीट’चा पेपर कसा फोडला, ते ही पुरावा न सोडता; चौकशीसाठी पोलिसांनी गाठलं मांढरेंचं कॉलेज! तपासात काय सापडलं पाहा!
- शेतकऱ्यांना कर्जवाटप वाढवा, सीबीलमुळे कुणालाही रोखू नका; मुख्यमंत्री फडणवीसांचे बँकांना निर्देश