Bakrid : बकरी ईदमुळे मुंबईत हाय अलर्ट; १० हजारांहून अधिक पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Bakrid बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी संपूर्ण शहरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे. सण शांततेत आणि सुरक्षित वातावरणात पार पडावा यासाठी पोलिस आयुक्त आणि सहपोलीस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) यांच्या मार्गदर्शनाखाली व्यापक बंदोबस्ताची आखणी करण्यात आली आहे.Bakrid

कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी मुंबईभर मोठ्या प्रमाणात पोलिस दल तैनात करण्यात आले आहे. सुरक्षा व्यवस्थेत ८ अतिरिक्त पोलिस आयुक्त, २१ पोलिस उपायुक्त आणि ६१ सहाय्यक पोलिस आयुक्तांचा समावेश आहे.Bakrid



याशिवाय १,९८० पोलिस अधिकारी आणि १०,११० पोलिस कर्मचारी शहरातील विविध भागांत बंदोबस्तासाठी नियुक्त करण्यात आले आहेत. संवेदनशील आणि महत्त्वाच्या ठिकाणी विशेष पथकेही तैनात करण्यात आली असून सतत गस्त वाढवण्यात आली आहे.

मुंबई पोलिसांनी नागरिकांना शांततेत आणि जबाबदारीने सण साजरा करण्याचे आवाहन केले आहे. गर्दीच्या ठिकाणी संयम बाळगावा तसेच पोलिस प्रशासनाला सहकार्य करावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, कोणतीही संशयास्पद हालचाल किंवा बेवारस वस्तू आढळल्यास तात्काळ पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन प्रशासनाने नागरिकांना केले आहे.

Mumbai on high alert for Bakrid; over 10,000 police personnel deployed

महत्वाच्या बातम्या