विशेष प्रतिनिधी
मुंबई : Amruta Fadnavis विविध सामाजिक उपक्रमांमुळे कायम चर्चेत असणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी आता पर्यावरण संरक्षण आणि आरोग्याच्या दृष्टीने एक अत्यंत कौतुकास्पद पाऊल उचलले आहे. भारत सरकारच्या इंधन बचत मोहिमेतून प्रेरणा घेत त्यांनी आपल्या जीवनशैलीत एक महत्त्वपूर्ण सकारात्मक बदल केला असून, आता घरापासून 5 ते 7 किलोमीटरच्या परिसरातील दैनंदिन कामांसाठी त्यांनी थेट सायकलचा वापर करण्यास सुरुवात केली आहे.Amruta Fadnavis
Inspired by PM Narendra Modi ji’s call for fuel conservation, I have started using a bicycle for all work within a 5-7 km radius from my home. It is a small personal step towards saving petrol and diesel, while also embracing a healthier lifestyle. Sometimes, meaningful change… pic.twitter.com/4PuwCZqwhZ
— AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) May 27, 2026
अमृता फडणवीस यांनी नुकताच सोशल मीडियावर सायकल चालवतानाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ पोस्ट करताना त्यांनी लिहिले की, पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या इंधन बचतीच्या आवाहनाने प्रेरित होऊन, मी माझ्या घरापासून 5 ते 7 किलोमीटरच्या अंतरावरील सर्व कामांसाठी सायकल वापरण्यास सुरुवात केली आहे. पेट्रोल आणि डिझेलची बचत करण्यासाठी, तसेच निरोगी जीवनशैलीचा अंगीकार करण्यासाठी हे माझे एक लहान वैयक्तिक पाऊल आहे. कधीकधी, अर्थपूर्ण बदलांची सुरुवात ही साध्या आणि छोट्या निवडींमधूनच होते, असे त्यांनी म्हटले आहे.
त्यांच्या या कृतीचे सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणावर स्वागत होत असून, “त्यांचे हे पाऊल इतरांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल,” अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांकडून दिल्या जात आहेत.
Amruta Fadnavis takes step towards fuel conservation, to travel five to seven kilometres by bicycle
महत्वाच्या बातम्या
- High Court : जनावरांच्या कत्तल निर्बंधांवर स्थगिती देण्यास उच्च न्यायालयाचा नकार
- Rohit Pawar : “भाजपसोबत जाणार नाही”; रोहित पवारांच्या विधानाने राष्ट्रवादीत नव्या चर्चांना उधाण
- ‘नीट’चा पेपर कसा फोडला, ते ही पुरावा न सोडता; चौकशीसाठी पोलिसांनी गाठलं मांढरेंचं कॉलेज! तपासात काय सापडलं पाहा!
- शेतकऱ्यांना कर्जवाटप वाढवा, सीबीलमुळे कुणालाही रोखू नका; मुख्यमंत्री फडणवीसांचे बँकांना निर्देश