विशेष प्रतिनिधी
छत्रपती संभाजी नगर : भारतीय जनता पक्षाकडून अन्याय हाेत असल्याची नाराजी व्यक्त करत माजी मंत्री व शिवसेना शिंदे गटाचे नेते अब्दुल सत्तार यांनी मुलाच्या माघारीसाठी तयारी दर्शविली आहे. सत्तार यांचे चिरंजीव समीर सत्तार यांनी विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरला हाेता.
अब्दुल सत्तार म्हणाले की, छत्रपती संभाजीनगर-जालना विधान परिषद निवडणुकीसंदर्भात माझे आणि मुख्यमंत्र्यांचे फोनवर बोलणं झाले आहे त्यांनी सांगितले की उमेदवारी अर्ज मागे घ्या. उद्या मी कार्यकर्त्यांनी बोलावून घेत अर्ज मागे घ्यायला लावणार आहे. यासाठी मला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाली. पण कार्यकर्त्यांना विश्वासात घेत उमेदवारी मागे घेतली तर नाराजीचा सुर राहत नाही.
नाराजी व्यक्त करताना सत्तार म्हणाले, सत्ता यावी यासाठी महायुतीच्या तिन्ही पक्षांनी मेहनत घेतली. पण सत्ता आल्यावर एकच पक्ष आपला पक्ष वाढवत असेल तर दुसरा पक्ष संपवत असेल तर ही संपूर्ण माहिती आम्ही आमच्या नेत्यांना दिली. ही माहिती दिल्यावर आमच्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील भाजपचे नेते जी वागणूक आम्हाला देऊ लागले आहे ती सत्ताधारी नाही तर विरोधकांपेक्षाही वाईट देत आहे, यावर आम्ही आमच्या नेत्यांकडे भावना व्यक्त केल्या.
अब्दुल सत्तार म्हणाले की, आमचा पक्ष संपू नये, पक्षाचे नुकसान होऊ नये ही आमची भावना आहे. कोणी मला पाठिंबा द्यावा असा माझा काही उद्देश नाही. बाळासाहेब ठाकरे यांचा बालेकिल्ला म्हणून या जिल्ह्याची ओळख आहे. आता जिल्ह्यातील संपूर्ण सत्ता आमचा मित्रपक्षच हिसकावून घेत आहे. काम करायला अडचण येत असेल तर त्यावर आम्हाला बोलावे लागेल. राज्यातील नाही तर स्थानिक नेत्यांवर आमचा रोष आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री दोघे यावर चर्चा करतील.
अब्दुल सत्तार यांनी स्पष्ट केले की, ही लढाई केवळ आमच्या जिल्ह्यापुरती आहे. राज्यात तसे काही नाही. स्थानिक पातळीवर काही मतभेद असले तरी राज्यात आणि देशात आम्ही भाजपसोबत खंबीरपणे उभे आहोत. राज्यात भाजप हा मोठा भाऊ तर राष्ट्रवादी काँग्रेस छोट्या भावाच्या भूमिकेत असून, आमच्यामुळे महायुतीला कोणताही तडा जाणार नाही. या वादावर पुढील तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली जाणार आहे.
अब्दुल सत्तार म्हणाले की, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आमचे नेते आहेत ते जे सांगतील ते जे बोलतील तो निर्णय अंतिम राहील. आमच्यामुळे राज्यातील युतीला कुठेही तडा जाणार नाही याची आम्ही दक्षता घेणार नाही. छत्रपती संभाजीनगरचे 6 आमदार आणि 1 खासदार यांची जवळपास साडेतीन तास शिंदेंसोबत बैठक झाली. दोन दिवसात काय ते स्पष्ट होईल.
अंबादास दानवे यांच्या भेटीवर बोलताना अब्दुल सत्तार म्हणाले की, आम्ही मुस्लिम असल्याने सर्वांना गळाभेट घेऊन भेटतो. मात्र जो काही निर्णय असेल तो एकनाथ शिंदेच घेणार. आम्ही जिल्ह्यापुरते मर्यादित कार्यकर्ते आहोत. हा विषय राज्याचा नाही. राज्यात भाजपच मोठा भाऊ आहे. आम्ही छोटे आहोत.
Expressing displeasure, Abdul Sattar is ready for his son’s nomination return.
महत्वाच्या बातम्या
- Manoj Jarange : सरकारी शिष्टमंडळाशी चर्चेनंतर मनोज जरांगेंनी उपोषण केले स्थगित
- Baramati : विधवा महिलेचा छळ, बारामतीत विद्यमान नगरसेवकावर गुन्हा दाखल
- Ghatkopar : घाटकोपर येथील पालिका मराठी शाळा वाचविण्यासाठी हजारोंचा जनआक्रोश
- मराठा आरक्षणाबाबत संविधानाच्या चौकटीत बसणारा निर्णय, ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाही, मुख्यमंत्र्यांचे आश्वासन