मुंडेसाहेबांनी आपल्या धमन्यांमध्ये भरलाय स्वाभिमान : पंकजा मुंडे यांचे स्मृतिदिनानिमित्त विविध संकल्प

विशेष प्रतिनिधी

बीड : मुंडे साहेबांनी काही आपल्या घरात सोन्याचे पोते आणून नव्हते ठेवले. पण आपल्या रक्तात, आपल्या धमन्यांंमध्ये स्वाभिमान भरला आहे. त्यामुळे आपण मुंडे साहेबांना कधीच विसरू शकत नाही. जाती धर्माच्या सगळ्या भिंती पाडून ज्यांच्यासाठी अश्रू गाळले आजच्या दिवशी सबंध देशातल्या लोकांनी त्या मुंडे साहेबांचे आणि त्या लोकांच्या अश्रूचे आणि आमचे नाते रक्ताच्या नात्यापेक्षा श्रेष्ठ नाही का? अशा भावना भारतीय जनता पक्षाच्या नेत्या व मंत्री पंकजा मुंडे यांनी व्यक्त केल्या.

लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या आज असलेल्या स्मृती दिनानिमित्त परळीतील गोपीनाथ गडावर भजन आणि कीर्तनासह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात भारूड गाताना पंकजा मुंडे भावूक झाल्या. त्या म्हणाल्या, जेवढे प्रेम तुम्ही मुंडे साहेबांवर करतात, तेवढे मी कर्जबाजारी होते. कारण माझा श्वास तुमच्याकडे गहाण टाकून मुंडे साहेब स्वर्गाला गेले आहेत. कारण मुंडे साहेबांना जेवढे तुम्ही प्रेम करता तेवढे तुमचे जोडे उचलण्याची क्षमता माझ्यात येते. तुमच्यासाठी कष्ट करण्याची क्षमता माझ्यामध्ये येते. मला या जीवनात तुमच्या प्रेमापेक्षा, तुमच्या सन्मानापेक्षा कुठलीच संपत्ती मोठी नाही, हे मी मुंडे साहेब आणि वैद्यनाथाची शपथ घेऊन सांगते.



3 जूनचा दिवस सोपा वाटतो, पण 2 जूनची रात्र मात्र फार फार कठीण असते. मी माझी आई, प्रीतम ताई आणि माझे दोन्ही लेकरं आम्ही काल रात्री इथे बसलो होतो आईजवळ. आई सतत रडत होती, एक टर्म तरी साहेबांना मिळायला पाहिजे होती, 5 वर्ष तरी साहेब जगायला पाहिजे होते. इतके कष्ट घेतले, पायात काटे रुतले, घाबरले नाही, उन्हात फिरले, खाल्ले नाही, जेवले नाही. ज्या माणसाने सत्तेवर बघायला सगळा देश प्रतीक्षा करत होता, देवाने असे न्यायालय नाही पाहिजे होते, अशी खंत पंकजा यांनी व्यक्त केली.

पंकजा मुंडे संकल्प सांगताना म्हणाल्या, आमच्या मोदीजीने सांगितले एक पेड मा के नाम. मी लवतेच. ‘एक पेड बाप के नाम’, हा माझा संकल्प असणार आहे. मुंडे साहेबांवर प्रेम करणाऱ्या सगळ्यांना एक रोप देणार आहे. ते रोप लावा आणि मोठे करा. मुंडे साहेबांची मान स्वर्गात उंचावली पाहिजे. माझ्याकडे पर्यावरणचे खाते आहे. मी संकल्प घेते आज, आज माझ्याकडून तुम्ही सगळ्यांनी एक एक रोप घेऊन जा. तुमच्या घरात वाढदिवस असेल, तुम्ही किमान 11 झाडे लावा, तुमच्या परिस्थितीप्रमाणे. तुमच्या घरी काही दुःख झाले असेल तेव्हा सुद्धा प्रत्येक माणसाला वृक्ष द्या.

ही वृक्षाची सावली पुढच्या पिढीसाठी आहे. आज आपण प्रत्येक श्वास घेत आहोत तो श्वास आपण पुढील पिढीकडून हिरावून घेत आहोत. त्यामुळे आता आपण वृक्ष लागवड केली पाहिजे. दुसरा संकल्प असा आहे की, पहिला मोठा मोर्चा जर कोणी शेतकऱ्यांसाठी काढला असेल तर तो मुंडे साहेबांनी काढला होता. त्यामुळे आता रासायनिक खताशीवाय शेती करायचा संकल्प मी केला आहे. मुंडे साहेबांनी शेतात काम केले होते. आज मी शेतावर जाऊन शेत नांगरणार आहे.

पंकजा मुंडे म्हणाल्या, 12 डिसेंबर रोजी सकाळी 5 वाजता उठून ऊसतोड कामगारांसोबत ऊस तोडीचे काम करणार आहे. मी हे कष्टकऱ्या लोकांसाठी आहे. जो दुर्बल आहे त्याची मदत करा, हे संकल्प आज मी तुमच्यासोबत सांगत आहे. जे कोणी माझ्यासोबत हे संकल्प करतील त्यांच्यावर माझी चांगली दृष्टी राहील. माझा आणखी एक संकल्प आहे, तो मी नवरात्रीत जाहीर करेल. तो संकल्प सगळ्या तुटलेल्या कड्या जोडण्यासाठी असेल. राजकीय पोळी भाजण्यासाठी नाही. तो नवरात्रीत मी तुम्हाला सांगेल.

Munde Saheb infused self-respect into our veins: Pankaja Munde announces initiatives on his death anniversary

महत्वाच्या बातम्या