विशेष प्रतिनिधी
पुणे : पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विक्रम संजय काकडे यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातून त्यांच्या सुमारे दीडशे कोटी रुपयांच्या मालमत्तेची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जय पवार यांना १० कोटी रुपयांचे कर्ज दिल्याचेही या प्रतिज्ञापत्रातून उघड झाले आहे.
प्रतिज्ञापत्रानुसार, विक्रम काकडे यांनी जय पवार यांच्याशिवाय परवेज ग्रँट यांना २.१७ कोटी रुपये तसेच रुस्तुम भरोचा, श्रीशा एंटरप्रायझेस, काकडे प्रमोटर्स, काकडे डेव्हलपर्स आणि राज डेव्हलपर्स यांसारख्या व्यक्ती व कंपन्यांना मिळून सुमारे ४०.९५ कोटी रुपयांचे कर्ज दिले आहे.
काकडे यांच्या मालमत्तेमध्ये विविध बँकांमधील ठेवी, शेअर्स, विमा योजना, पोस्टातील गुंतवणूक, ४१० ग्रॅम सोने, पाच किलोहून अधिक चांदी, आलिशान घड्याळे, मोटारगाड्या आणि आलिशान बोटींचा समावेश आहे. बांधकाम क्षेत्रात त्यांनी सुमारे १५ कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. त्यांच्या नावावर साडेसात लाख रुपये रोख असून विविध बँक खात्यांमध्ये २९.५३ लाख रुपयांची रक्कम जमा आहे.
प्रतिज्ञापत्रात नमूद केल्यानुसार, विक्रम काकडे यांच्यावर ४१.८० कोटी रुपयांचे कर्ज आहे. त्यांच्या नावावर ५० लाख रुपये किमतीची परवानाधारक शस्त्रे असून एकूण जंगम मालमत्तेची किंमत ७८.९५ कोटी रुपये आहे.
स्थावर मालमत्तेमध्ये मावळ तालुक्यातील दोन ठिकाणच्या जमिनी, मुंढवा येथील मालमत्ता तसेच पाषाण येथे ४,५४४ चौरस फूट क्षेत्रफळाच्या दोन सदनिकांचा समावेश आहे. यापैकी एक सदनिका त्यांनी पत्नी देविका काकडे यांना भेटस्वरूप दिली आहे. याशिवाय दुबईमध्येही त्यांची आलिशान सदनिका आहे. विक्रम काकडे यांच्या नावावर ७४.०७ कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता असून पत्नी देविका यांच्या नावावर ९.१९ कोटी रुपयांची मालमत्ता आहे. त्यांच्याकडे ८.३९ कोटी रुपयांचा प्राप्तिकर थकीत असल्याचेही प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे उमेदवार श्रीकांत पाटील यांच्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांच्याकडे दोन लाख रुपये रोख, तर त्यांच्या पत्नींकडे ४० हजार आणि आईकडे २५ हजार रुपये रोख आहेत. पाटील यांच्याकडे दोन तोळे, तर पत्नींकडे ५० तोळे सोने असून आईकडे पाच किलो चांदी आहे.
श्रीकांत पाटील यांच्या कुटुंबाची एकूण जंगम मालमत्ता सुमारे १.०८ कोटी रुपये आहे. तळेगाव दाभाडे येथे १७ एकर जमीन, बोपोडी येथे बिगरशेती जमीन तसेच निवासी मालमत्ता त्यांच्या कुटुंबाच्या नावावर आहे. या वडिलोपार्जित मालमत्तेची एकूण किंमत ३७.१० कोटी रुपये असल्याचे प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आले आहे.
NCP candidate Vikram Kakade’s affidavit reveals ₹150 crore wealth, ₹10 crore loan to Jay Pawar
महत्वाच्या बातम्या
- Manoj Jarange : सरकारी शिष्टमंडळाशी चर्चेनंतर मनोज जरांगेंनी उपोषण केले स्थगित
- Baramati : विधवा महिलेचा छळ, बारामतीत विद्यमान नगरसेवकावर गुन्हा दाखल
- Ghatkopar : घाटकोपर येथील पालिका मराठी शाळा वाचविण्यासाठी हजारोंचा जनआक्रोश
- मराठा आरक्षणाबाबत संविधानाच्या चौकटीत बसणारा निर्णय, ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाही, मुख्यमंत्र्यांचे आश्वासन