विशेष प्रतिनिधी
मुंबई: जर कृष्णा आष्टीकर खरोखर उद्धव ठाकरेंसोबत असतील, तर त्यांनी उद्या स्वतःच्या वडिलांचं पिंडदान करून दाखवावं आणि त्यांच्या प्रतिमेला जोडे मारून दाखवावेत. मग आम्ही मान्य करू की ते आमच्यासोबत आहेत. बाप तसा बेटा आहे,” असे आव्हान शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी दिला.
बंडखोर खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचे पुत्र कृष्णा आष्टीकर यांनी आपण अद्याप उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबत असल्याचा दावा केल्यानंतर ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी त्यांना अत्यंत आक्रमक शब्दांत आव्हान दिले आहे.
कृष्णा आष्टीकर यांनी काही दिवसांपूर्वी माध्यमांशी संवाद साधताना आपण वडिलांच्या संपर्कात नसल्याचे सांगितले होते. नागेश आष्टीकर यांनी शिंदे गटात जाण्याचा निर्णय का घेतला, याची आपल्यालाही कल्पना नसल्याचा दावा त्यांनी केला होता. त्यांनी म्हटले होते की, “मी अजूनही उद्धव ठाकरेंसोबत आहे. वडिलांनी घेतलेल्या निर्णयाबाबत मला कोणतीही पूर्वकल्पना नव्हती.” सुषमा अंधारेंच्या टीकेला प्रत्युत्तर देताना कृष्णा आष्टीकर यांनीही पलटवार केला. त्यांनी आरोप केला की, “सुषमा अंधारेंच्या बोलघेवडेपणामुळेच पक्ष फुटीच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे.”
शिवसेनेच्या 60 व्या वर्धापनदिनानिमित्त मुंबईत झालेल्या कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलताना सुषमा अंधारे म्हणाल्या, ”
ओमराजे निंबाळकर यांच्याबद्दल मला सर्वाधिक वाईट वाटतं. ज्याला आम्ही आपलं मानलं, ज्याच्यासाठी लढलो, तोच निघून गेला. एकदा विकलेले लोक पुन्हा पुन्हा विकले जातात. उद्या मोठी बोली लागली तर हे पुन्हा दुसरीकडे जातील.”
शिंदे गटावर निशाणा साधताना अंधारे म्हणाल्या, “तुमच्याकडे भुंकणारे लोक असतील, पण माणसं निवडून आणणारे नाहीत. आम्ही कार्यकर्ते घडवणारे आणि ब्रँड तयार करणारे आहोत.”
वर्धापनदिन सोहळ्यात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी, “माझ्या नेतृत्वाबाबतच्या आरोपांमध्ये तथ्य वाटत असेल तर मी पक्षप्रमुखपद सोडायला तयार आहे,” असे वक्तव्य केले होते. या विधानामुळे सभागृहातील अनेक शिवसैनिक भावूक झाले. सुषमा अंधारे यांच्याही डोळ्यांत अश्रू आल्याचे पाहायला मिळाले. याबाबत त्या म्हणाल्या, “आम्ही उद्धव ठाकरे यांना नेता मानलं आहे. त्यांनी पक्षप्रमुखपद सोडण्याचा विचारही करू नये. आम्ही त्यांच्यासोबत लढायला तयार आहोत.”
Sushma Andhare challenges Krishna Ashtikar
महत्वाच्या बातम्या
- Shinde Sena : मुंबई महापालिकेत ‘ऑपरेशन टायगर’? ठाकरे गटातील 25 नगरसेवक संपर्कात असल्याचा शिंदे सेनेचा दावा
- Deepak Sawant : मुंबई महापालिकेत ठाकरे गटाला झटका, दीपक सावंत यांचे जात प्रमाणपत्र अवैध
- Sanjay Raut : मानहानीच्या खटल्यात संजय राऊत यांच्या निर्दोषमुक्तीला मेधा सोमैया यांचे हायकोर्टात आव्हान
- BEST Employees’ : न्यायालयाच्या आदेशानंतरही बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप