विशेष प्रतिनिधी
सांगली : अत्यंत प्रतिष्ठेच्या आणि चुरशीच्या ठरलेल्या सांगली-सातारा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत महायुतीचे उमेदवार धैर्यशील कदम यांनी दणदणीत विजय मिळवत विधान परिषदेत प्रवेश निश्चित केला आहे. त्यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार अभयसिंह जगताप यांचा तब्बल ३०१ मतांच्या फरकाने पराभव केला. Dhairyashil Kadam
मतमोजणीअंती एकूण ८९४ मतदानांपैकी ९ मते अवैध ठरली, तर ८८५ मते वैध मानण्यात आली. विजयासाठी आवश्यक कोटा ४४३ मतांचा होता. अंतिम निकालात धैर्यशील कदम यांना ५९३ मते मिळाली, तर अभयसिंह जगताप यांना २९२ मते मिळाली. त्यामुळे पहिल्याच पसंतीच्या मतांमध्ये कदम यांनी सहज विजय मिळवत महायुतीचे वर्चस्व कायम राखले.
निकाल जाहीर होताच मतमोजणी केंद्राबाहेर महायुतीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. फटाक्यांची आतषबाजी, गुलालाची उधळण आणि जोरदार घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला. महायुतीच्या नेत्यांनी हा विजय विकासकामांवर आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमधील मजबूत संघटनात्मक जाळ्यावर मतदारांनी दाखवलेल्या विश्वासाचा कौल असल्याचे म्हटले.
दुसरीकडे, पराभवानंतर महाविकास आघाडीचे उमेदवार अभयसिंह जगताप यांनी महत्त्वाचा दावा केला. महाविकास आघाडीकडे स्वतःची केवळ १९२ मते असताना त्यांना २९२ मते मिळाल्याचे सांगत महायुतीची सुमारे १०० मते फुटून आपल्याला मिळाल्याचा दावा त्यांनी केला. या दाव्यामुळे निकालानंतर राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आले आहे.
Mahayuti retains Sangli-Satara MLC seat; Dhairyashil Kadam wins by 301 votes
महत्वाच्या बातम्या