Nagpur madrasa : नागपूरच्या मदरसात अल्पवयीन १० मुलांवर अनैसर्गिक अत्याचार

विशेष प्रतिनिधी

नागपूर :Nagpur madrasa  नागपूर येथे एका मदरसात चक्क अल्पवयीन १० मुलांसोबत अनैसर्गिक अत्याचार झाल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. सक्करदरा पोलीस हद्दीत मोठा ताजबाग भागातल्या आशिर्वाद नगराला लागून तावीज नगरातील मदरसात हा प्रकार उघडकीस आला.Nagpur madrasa

ताय रसूल उर्फ तानिफ (२६) असे अनैसर्गिक कृत्य करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. तो मदरसातील मुलांना धार्मिक विधी शिकवत होता. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सक्करदरा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील या मदरसात मुलांवर अत्याचार होत असल्याची तक्रार पोलिसांपर्यंत पोहोचली. यानंतर तक्काळ बीट मार्शलला घटनास्थळी पाचारण करण्यात आले.Nagpur madrasa

अत्याचार पिडी सर्व १० मुले बिहार आणि मध्यप्रदेश राज्यातून धार्मिक विधी शिकवण्यासाठी या मदरसात आणण्यात आले होते. पीडित मुलांच्या कुटुंबानाही फोन करून माहिती देण्यात आली. पोलिसांनी पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला. त्यांच्यासोबत हा किळसवाणा प्रकार घडला.Nagpur madrasa



पिडीत मुलांना ठाण्यात आणून पोलिसांनी त्यांची चौकशी केली. एका १४ वर्षीय मुलाने आपल्यावर लैंगिक आण ि अनैसर्गिक अत्याचार होत असल्याचे पोलिसांना कथन केले. पोलिसांनी तत्काळ बाल संरक्षण विभागालाही माहिती दिली. सर्व मुलांची तातडीने वैद्यकीय तपासणी करण्यात आली. मात्र, कारवाईची कुणकूण लागताच आरोपी फरार झाला. या प्रकरणात आरोपींची संख्याआणि पिडीतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

बालकल्याण विभागाच्या मदतीने सर्व अल्पवयीन मुलांना बालगृहात ठेवण्यात आले आहे, अशी माहिती ठाणेदार रमेश खुणे यांनी दिली. बालसंसरक्षण अधिकाऱ्यांनी मुस्ताक पठाण यांनी देखील त्याला दुजोरा देताना ही मुले मध्य प्रदेश आणि बिहारमधील असल्याचे सांगितले.

Nagpur madrasa teacher booked for alleged abuse of 10 minor boys

महत्वाच्या बातम्या