MPSC : एमपीएससी पूर्व परीक्षेनंतर अवघ्या महिनाभरात निकाल जाहीर; पुण्याचे सर्वाधिक 1,828 उमेदवार यशस्वी

विशेष प्रतिनिधी

पुणे : MPSC  महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 चा निकाल जाहीर केला असून राज्यसेवा गट-अ आणि गट-ब मुख्य परीक्षेसाठी 4,103 उमेदवार पात्र ठरले आहेत. विशेष म्हणजे, 31 मे रोजी झालेल्या पूर्व परीक्षेचा निकाल अवघ्या महिनाभरात जाहीर करून आयोगाने वेगवान कार्यपद्धतीचा प्रत्यय दिला आहे.MPSC

आयोगाने पात्र उमेदवारांची यादी आणि गुणांची सीमारेषा आपल्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे. मुख्य परीक्षेसाठी केवळ पूर्व परीक्षेत पात्र ठरून विहित मुदतीत अर्ज आणि परीक्षा शुल्क भरणाऱ्या उमेदवारांनाच प्रवेश दिला जाणार आहे.MPSC



निकालानुसार पुणे केंद्रातील सर्वाधिक 1,828 उमेदवार मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरले आहेत. त्यापाठोपाठ नाशिकमधील 199, अहिल्यानगरमधील 193, कोल्हापूरमधील 179, छत्रपती संभाजीनगरमधील 172 आणि साताऱ्यातील 145 उमेदवारांनी यश मिळवले आहे.

मुख्य परीक्षेसंदर्भातील स्वतंत्र अधिसूचना लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे. तसेच सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीय आरक्षणासह विविध न्यायालयीन प्रकरणांतील अंतिम निर्णयांच्या अधीन राहून हा निकाल जाहीर करण्यात आल्याचेही एमपीएससीने नमूद केले आहे.

MPSC declares State Services prelims results; 4,103 candidates qualify for mains

महत्वाच्या बातम्या