विशेष प्रतिनिधी
मुंबई : Sharad Pawar ज्या एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राचं सरकार पाडलं, बेईमानी केली त्यांच्या कार्यक्रमाला शरद पवारांनी जायला नको होते. त्यांना अशाप्रकारे सन्मान देणे हे महाराष्ट्राच्या अस्मितेला आणि स्वाभीमानाला धक्का लावणारे असल्याचा संताप शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे.Sharad Pawar
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते दिल्लीत हा पुरस्कार देण्यात आला. शिवसेना फोडणाऱ्या शिंदेंना शरद पवारांनी पुरस्कार दिल्यावरून शिवसेना ठाकरे गटचरे प्रवक्ते संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला आहे. ते आज माध्यमांशी बोलत होते.
राऊत म्हणाले,महाराष्ट्राचं राजकारण फार विचित्र दिशेने चाललं आहे. कोण कोणाला टोप्या घातलंय आणि कोणाच्या टोप्या उडवतंय, हे पुन्हा एकदा समजून घ्यावे लागेल. महाराष्ट्रातील लोकांसमोर आम्ही कोणत्या तोंडाने जाणार? राजकारणात कोण-कोणाचा शत्रू किंवा मित्र नसतो, हे ठीक आहे. पण ज्यांनी महाराष्ट्राची वाट लावली, ज्यांना आम्ही महाराष्ट्राचे शत्रू समजतो, त्यांना अशाप्रकारे सन्मान आपल्या हातून देणं हे महाराष्ट्राच्या अस्मितेला आणि स्वाभीमानाला धक्का लावणारा आहे. ही आमच भावना आहे, कदाचित पवारांची भावना वेगळी असू शकेल. पण हे महाराष्ट्रातील जनतेला पटलेलं नाही. कारण शरद पवारांचा आम्ही आदर करतो.
ज्यांनी शिवसेना फोडली अशांना तुम्ही सन्मानित करता यामुळे आम्हाला वेदना झाल्या. दिल्लीतील राजकारण वेगळं असेल, पण यामुळे आम्हाला वेदना झाल्या. काही गोष्टी राजकारणात टाळायच्या असतात. तुमचं आणि अजित पवारांचं गुफ्तगु होत असेल, पण याचं भान राखून आम्ही पुढचं पाऊल टाकतो, असा इशाराही संजय राऊत यांनी दिला आहे.
Sharad Pawar shocked the identity of Maharashtra, Sanjay Raut was inflamed by Eknath Shinde’s felicitation
महत्वाच्या बातम्या
- आरक्षणासाठी मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने 22फेब्रुवारी पासून आंदोलन
- Arvind Kejriwal अरविंद केजरीवाल यांचा पंजाबच्या मुख्यमंत्रीपदावर डोळा
- Shashi Tharoor शशी थरूर बनले पंतप्रधान मोदींच्या परराष्ट्र धोरणाचे चाहते, ‘या’ मुद्द्यावर झाले सहमत
- Chief Minister Delhi दिल्लीला पुन्हा महिला मुख्यमंत्री मिळेल का? भाजपच्या संभाव्य उमेदवार कोण आहेत जाणून घ्या