Muralidhar Mohol : सहकाराचे शिक्षण देणारे सहकार विद्यापीठ उभारणार, मुरलीधर मोहोळ यांची माहिती

विशेष प्रतिनिधी

पुणे : Muralidhar Mohol  सहकारविषयक अभ्यास करणारे, शिक्षण देणारे विद्यापीठ भारत सरकार उभे करत आहे. या संदर्भातील बिल लोकसभेसमोर अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान मांडले गेले आहे. पुढच्या अधिवेशनात याची मंजुरी मिळविण्यावर काम होईल, अशी माहिती केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली.Muralidhar Mohol

पुण्यात झालेली ही परिषद म्हणजे आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष जाहीर झाल्यानंतरचा पहिलाच कार्यक्रम होता, अशी माहिती देऊन मोहोळ म्हणाले की, आशिया-आफ्रिका खंडातील देशांसोबत सहकार क्षेत्रातील संबंध दृढ होतील, याचे समाधान आहे.



पुण्यात झालेली ही परिषद म्हणजे आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष जाहीर झाल्यानंतरचा पहिलाच कार्यक्रम होता, अशी माहिती देऊन मोहोळ म्हणाले की, CICTAB व VAMNICOM ने या परिषदेचे यशायोग्य आयोजन केले, तसेच इथे उपस्थित आशिया-आफ्रिका खंडातील देशांसोबत सहकार क्षेत्रातील संबंध दृढ होतील, याचे समाधान आहे.

मोहोळ म्हणाले, सहकारातून समृद्धी साधली जाऊ शकते, या विश्वासाने आणि उद्दिष्टाने सरकार सुरुवातीपासून प्रयत्न करत आहे; त्याचेच पुढचे पाऊल म्हणजे सहकार विद्यापीठ आहे. ग्रामीण भागात सहकार क्षेत्रामुळे शाश्वत विकास झाला आहे. सहकारी बँकांचे बळकटीकरण करण्यासाठी सरकारने विशेष प्रयत्न केले आहेत.

कृषी बँक व्यवसायातील आंतरराष्ट्रीय सहकार व प्रशिक्षण केंद्र अर्थात The Centre for International Cooperation and Training in Agricultural Banking (CICTAB) ने वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकार संस्थेच्या साहाय्याने या परिषदेचे आयोजन केले आहे. ‘सहकारी संस्थांद्वारे समृद्धी आणणे: डिजिटल इनोव्हेशन आणि मूल्य साखळी’ या संकल्पनेवर आधारित ही परिषद होती.

A cooperative university providing cooperative education will be established, informed by Muralidhar Mohol

महत्वाच्या बातम्या