मंत्रिमंडळ उपसमिती बरखास्त करा , 29 मेच्या आत मराठवाड्यातील सर्व मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्रे वाटप करा : मनाेज जरांगे यांची मागणी

विशेष प्रतिनिधी

जालना : मराठा आरक्षणासाठी नेमण्यात आलेली मंत्रिमंडळ उपसमिती तात्काळ बरखास्त करावी, 29 मेच्या आत मराठवाड्यातील सर्व मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्रे वाटप करण्यात यावीत, अशी मागणी मराठा आंदाेलक मनोज जरांगे यांनी केली आहे. यासाठी त्यांनी राज्य सरकारला 29 मे 2026 पर्यंतची अंतिम मुदत दिली आहे. Manoj Jarange

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी 30 मे पासून आंतरवाली सराटी येथे आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर भाजप नेते प्रसाद लाड यांनी आज अंतरवालीमध्ये मनोज जरांगे यांची भेट घेतली.



मनाेज जरांगे म्हणाले, 58 लाख नोंदींचे काय झाले सांगा. नोंदी सापडून तुम्ही प्रमाणपत्र का दिले नाहीत? 29 मेच्या आत मराठवाड्यातील सर्व मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्रे वाटप करण्यात यावीत, अशी मुख्य मागणी आहे. मुंबई आंदोलनादरम्यान राज्य सरकारने दिलेली आश्वासने 8 महिने उलटूनही पूर्ण केली नसून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाची दिशाभूल व फसवणूक केली आहे.

मनोज जरांगे यांनी राज्य सरकारपुढे दहा मागण्या मांडल्या आहेत. त्या पुढीलप्रमाणे : मराठवाड्यातील सर्व मराठ्यांना 29 मे च्या आता कुणबी प्रमाणपत्र द्या.सातारा, कोल्हापूर, औंध आणि पुणे, मिरज संस्थांचा जीआर काढा. 1994 च्या धर्तीवरच जीआर काढा. महाराष्ट्रातील सर्व सरसकट गुन्हे मागे घ्या. आंदोलनात बलिदान देणाऱ्या कुटुंबीयांना महावितरण आणि एमआयडीसी मध्ये नोकरीचा जीआर काढा.

सारथीच्या सर्व योजना पुन्हा सुरू करा. महामंडळाचे सर्व परतावे ताबडतोब वाटप केले पाहिजे. कुणबी प्रमाणपत्र दिलेले त्याची पडताळणी (व्हालिडिटी) द्या. मराठा उपसमिती काही कामाची नाही, अध्यक्षाला काम नाही. उपसमिती बरखास्त करा. स्वतंत्र कुणबी आणि मराठा मंत्रालय स्थापन करा. शिंदे समितीला मुदतवाढ देऊन रेकॉर्ड तपासायला लावा.

distribute Kunbi certificates to all Marathas in Marathwada by May 29: Manoj Jarange’s demand

महत्वाच्या बातम्या