विशेष प्रतिनिधी
चंद्रपूर : जंगलात तेंदूपत्ता तोडण्यासाठी गेलेल्या महिलांवर वाघिणीने केलेल्या हल्ल्यात चार महिलांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना चंद्रपूरच्या सिंदेवाही तालुक्यात घडली आहे. या घटनेत इतर काही महिला जखमी झाल्याची माहिती आहे.
सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाही जंगलात शुक्रवारी सकाळी 9 च्या सुमारास ही घटना घडली. गुंजेवाही येथील 13 महिलांचा एक समूह शुक्रवारी सकाळी तेंदूपत्ता वेचण्यासाठी जंगलात गेल्या होत्या. तेंदूपत्ता वेचण्याचे काम सुरू असताना या महिलांवर वाघिणीने अचानक हल्ला चढवला. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे या महिला घाबरल्या व जिवाच्या आकांताने सैरावैरा पळत सुटल्या.
पण वाघाने 4 महिलांवर झडप घातली. त्यात त्यांचा बळी गेला. इतर महिलांपैकी 1 महिला ओरडतच गावात आली. तिने आरडाओरडा करत गावकऱ्यांना घडलेल्या घटनेची माहिती दिली.
गावकरी लाठ्या काठ्या घेऊन घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी तिथे 4 महिलांचे मृतदेह आढळून आले. यावेळी इतर महिला सुखरूप असल्याची माहिती आहे. वनविभागाने घटनास्थळी पोहोचून स्थितीचा आढावा घेतला. तसेच पुढील तपास सुरू केला. या घटनेत कवडूबाई दादाची मोहुर्ले (45), अनुबाई दादाजी मोहुर्ले (46), संगीता संतोष चौधरी (36) व सुनीता कौशिक मोहुर्ले (33) या 4 महिलांचा बळी गेला. यामुळे मोहुर्ले व चौधरी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
Four women killed in attack by tigress while going to pick tendu leaves
महत्वाच्या बातम्या
- High Court : जनावरांच्या कत्तल निर्बंधांवर स्थगिती देण्यास उच्च न्यायालयाचा नकार
- Rohit Pawar : “भाजपसोबत जाणार नाही”; रोहित पवारांच्या विधानाने राष्ट्रवादीत नव्या चर्चांना उधाण
- ‘नीट’चा पेपर कसा फोडला, ते ही पुरावा न सोडता; चौकशीसाठी पोलिसांनी गाठलं मांढरेंचं कॉलेज! तपासात काय सापडलं पाहा!
- शेतकऱ्यांना कर्जवाटप वाढवा, सीबीलमुळे कुणालाही रोखू नका; मुख्यमंत्री फडणवीसांचे बँकांना निर्देश
- मराठा युवकांसाठी देवेंद्र फडणवीस सरकारचा मोठा निर्णय, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाला 150 कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी