महागाईच्या विरोधात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आंदोलन

विशेष प्रतिनिधी

मुंबई : वाढत्या महागाईच्या विरोधात नवी मुंबईत राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाकडून आक्रमक पद्धतीने आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाच्या वेळी पक्षातील प्रमुख नेते रोहित पवार, जितेंद्र आव्हाड, शशिकांत शिंदे, रोहिणी खडसे, सक्षणा सलगर यांनाही ताब्यात घेतले Sharad Pawar

कार्यकर्त्यांनी भररस्त्यात खाली बसून, रस्त्यावरच चूल पेटवून भाकरी थापली. यावेळी रोहित पवार या महिला कार्यकर्त्यांसोबत होते. प्रसारमाध्यमांशी बोलताना रोहित पवार म्हणाले, महागाई मोठ्या प्रमाणात वाढत चाललेली आहे, लोकांचं जीवन अवघड होत चाललं आहे. पेट्रोलचे, डिझेलचे भाव वाढलेत. घरगुती गॅस महागला, कमर्शिअल गॅसचेही दर वाढलेत. यामुळे सामान्य व्यक्ती, मध्यम वर्ग चांगलाच अडचणीत सापडला आहे.



त्यांच्यावतीने, त्यांचा आवाज बनून, सरकारपर्यंत त्यांचा आवाज जावा, झोपलेल्या सरकारला कुठेतरी जाग यावी या हेतूने आम्ही हे आंदोलन करत आहोत. कोणाला तरी लोकांच्या बाजून लढावे लागेल ना. सरकार ऐकेल, न ऐकेल, काय होईल माहीत नाही, पण लढणे ही आमची भूमिका आहे. लोकांसाठी बोलणं ही आमची भूमिका आहे. लोकांच्या वतीने आम्ही बोलत आहोत, लढत आहोत.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, राज्याची नव्हे तर देशाची आर्थिक परिस्थिती ही प्रचंड अडचणीत आहे. याबद्दल आम्ही सगळे वारंवार बोललो आहोत. माझी भारत सरकारला विनंती आहे की पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली एक सर्वपक्षीय बैठक बोलवावी आणि देशाच्या आर्थिक परिस्थितीवर चर्चा झाली पाहिजे. राजकारणाचा विषय नाहीये, महागाईमुळे भरडल्या जाणाऱ्या सर्वसामान्य माणसाचा हा विषय आहे. इमानदार, सामान्य माणूस यात भरडला जातोय, हे होणार आहे, आम्ही गेल्या 6 महिन्यांपासून पार्लमेंटमध्ये वारंवार बोलूनही दाखवले आहे, त्यामुळे आम्हाला आश्चर्य वाटत नाही, असे सुळे यांनी म्हटले आहे.

Nationalist Party Sharad Pawar group’s protest against inflation

महत्वाच्या बातम्या