ओवेसी लादेनसारखेच.. एआयएमआयएमवर बंदी घालण्याची नितेश राणे यांची मागणी

विशेष प्रतिनिधी

मुंबई : ओसामा बिन लादेन आणि असदुद्दीन ओवेसी यांच्यात कोणताही फरक नाही. जे काम लादेन अल-कायदाच्या माध्यमातून करायचा, तेच काम आता ओवेसी एआयएमआयएमच्या माध्यमातून करत आहेत. निवडून आल्यापासून त्यांनी समाजहिताचं कोणतं मोठं काम केलं? त्यांच्या जाहीरनाम्यात फक्त ‘जिहाद’ पुकारण्याचाच अजेंडा असतो, अशी कडवी टीका भारतीय जनता पक्षाचे नेते व मंत्री नितेश राणे यांनी केली आहे. ज्या पद्धतीने केंद्र सरकारने पीएफआय या संघटनेवर बंदी घातली, त्याच धर्तीवर एआयएमआयएमवर देखील तात्काळ बंदी घालण्यात यावी, अशी मागणीही राणे यांनी केली आहे.

एआयएमआयएम नेते वारिस पठाण नाशिक टीसीएस प्रकरणावर बाेलताना म्हणाले हाेते की, निदा खान यांना अटक करून कोठडीत पाठवण्यात आले आहे. त्यांना न्यायालयात हजर करण्यापूर्वीच, ‘गोदी मीडिया’ने त्यांना दहशतवादी घोषित करून एक मोठा मीडिया ट्रायल सुरू केला. हे चालवणारे हे लोक कोण? जर खटला चालवायचाच असेल, तर त्यांनी न्यायालये बंद करावीत.



जर त्यांच्या जागी एखादी निरपराध हिंदू भगिनी असती, तर मी त्यांना पाठिंबा दिला असता. हे लोक कायद्याबद्दल अनभिज्ञ आहेत. त्यांनी त्याचा अभ्यासही केलेला नाही. कायद्यानुसार, जोपर्यंत न्यायालय एखाद्या व्यक्तीला दोषी सिद्ध करत नाही, तोपर्यंत ती व्यक्ती निर्दोष मानली जाते, पण इथे ते तिला आत्ताच दोषी ठरवण्याचा प्रयत्न करत आहेत.

ते तिला दहशतवादी ठरवतात, पण प्रत्यक्षात काय घडले? टीसीएसच्या निवेदनाने हे स्पष्ट केले आहे की निदा खान एचआर प्रमुख नव्हत्या. त्या केवळ एक टेलि-रिस्पॉन्डर होत्या. खरे तर, एचआर प्रमुख एक गैर-मुस्लिम आहेत आणि त्यांना अटक करण्यात आली. याचा वापर करून संपूर्ण पक्षाला लक्ष्य करणे पूर्णपणे चुकीचे आहे. आम्हाला कायद्याची पूर्ण जाणीव आहे आणि आम्ही कायदेशीर मार्गाने पूर्ण प्रत्युत्तर देऊ, असा इशाराही पठाण यांनी दिला हाेता.

त्यावर प्रत्युत्तर देताना राणे यांनी थेट असुद्दीन ओवेसी आणि एमआयएएमवर निशाणा साधला. राणे यांच्या टीकेमुळे राजकीय वातावरण तापले आहे. निदा खानला छत्रपती संभाजी नगर येथे अटक केल्यापासून एआयएमआयने तिची पाठराखण केली आहे.

Nitesh Rane Demands Ban on All India Majlis-e-Ittehadul Muslimeen, Says “Owaisi Is Like Laden”

महत्वाच्या बातम्या