सुनेत्रा पवारांनी देशातील सर्वात मोठ्या मताधिक्याचा रेकॉर्ड मोडला

विशेष प्रतिनिधी

पुणे : बारामती पोटनिवडणुकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी ऐतिहासिक कामगिरी करत देशातील सर्वात मोठ्या मताधिक्याचा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे. 24 व्या फेरीअखेर सुनेत्रा पवार यांना तब्बल 2 लाख 18 हजार 930 मते मिळाली आहेत. Sunetra Pawar

यापूर्वी हा विक्रम उत्तर प्रदेशातील साहिबाबाद मतदारसंघातील आमदार सुनील कुमार शर्मा यांच्या नावावर होता. 2022 च्या निवडणुकीत त्यांना 2 लाख 14 हजार 835 मते मिळाली होती. मात्र, सुनेत्रा पवार यांनी हा आकडा मागे टाकत नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.

बारामतीत झालेल्या या पोटनिवडणुकीत मतदारांनी मोठ्या संख्येने मतदान करत सुनेत्रा पवार यांच्यावर विश्वास व्यक्त केला आहे.



उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर होणाऱ्या बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह 23 उमेदवार रिंगणात आहेत. मात्र एकाही उमेदवाराला तीन आकडी मते मिळाली नाहीत. सुनेत्रा पवार यांच्यानंतर सर्वाधिक मते नोटाला मिळाली आहेत.
बारामतीमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. पण सुनेत्रा पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत विजयी मिरवणुका आणि गुलालाची उधळण करू नका, असे आवाहन कार्यकर्त्यांना केले आहे.

बारामती पोटनिवडणुकीची मतमोजणी सुरू असताना सुनेत्रा पवारांनी सोशल मीडियावर पोस्ट केली. त्यांची ही पोस्ट व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये त्यांनी असे लिहिले की, आज बारामती विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर होत असताना आपण सर्वांनी आपल्या मतांमधून दाखवलेला विश्वास मी आदरणीय अजितदादांच्या पवित्र स्मृतींना समर्पित करते. आजचा हा निकाल जाहीर होत असताना आदरणीय दादांच्या आठवणींना उजाळा मिळाल्याने आपण सर्वजण भावूक आहोत.’

Sunetra Pawar breaks record for highest victory margin in the country

महत्वाच्या बातम्या