विशेष प्रतिनिधी
छत्रपती संभाजी नगर : भाजपने विधानपरिषदेच्या 6 जागांसाठी उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. यात प्रज्ञा सातव वगळता इतर 5 जागांवर नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू मानल्या जाणाऱ्या आमदार संजय केनेकर यांना उमेदवारी मिळाली नाही.Sanjay Kenekar
संजय केनेकर यांनी या प्रकरणी कवीवर्य सुरेश भट यांच्या कवितेचा दाखला देत हा आपला पराभव नसल्याचे स्पष्ट करत आपल्या पुनरागमनाचे संकेत दिलेत.
महाराष्ट्र विधानसभेच्या 10 जागांसाठी येत्या 12 मे रोजी निवडणूक होणार आहे. भाजपने यापैकी आपल्या वाट्याला येणाऱ्या 6 जागांवर नव्या चेहऱ्यांना संधी देत यावेळीही धक्कातंत्र वापरले. यात सुनील विनायक कर्जतकर, माधवी नाईक, संजय नत्थूजी भेंडे, विवेक बिपिनदादा कोल्हे व प्रमोद शांताराम जठार यांचा समावेश आहे. याशिवाय प्रज्ञा सातव यांनाही भाजपने उमेदवारी दिली आहे. यामुळे संजय केनेकर यांच्यासह विधिमंडळाच्या वरिष्ठ सभागृहाचा कार्यकाळ संपणाऱ्या कोणत्याही आमदाराला पुन्हा संधी मिळाली नाही. यामुळे हे आमदार नाराज असल्याची माहिती आहे.
संजय केनेकर यांना उमेदवारीची अपेक्षा होती. पण त्यांच्याही नावाचा फेरविचार करण्यात आला नाही. यामुळे संजय केनेकर यांनी कवीवर्य सुरेश भट यांच्या कवितेचा दाखला देत आपल्या भावना व्यक्त करत आपल्या पुनरागमनाचे संकेत दिलेत. विझलो आज जरी मी, हा माझा अंत नाही. पेटेन उद्या नव्याने, हे सामर्थ नाशवंत नाही. छाटले जरी पंख माझे, पुन्हा उडेन मी. अडवू शकेल मला, अजून अशी भिंत नाही. माझी झोपडी जाळण्याचे, केलेत कैक कावे. जळेल झोपडी अशी, आग ती ज्वलंत नाही, अशी भावना संजय केनेकर यांनी या प्रकरणी व्यक्त केली.
This is not the end of me, Sanjay Kenekar expressed his displeasure
महत्वाच्या बातम्या
- Parth Pawar : व्हीएसआर कपंनीच्या विमानातून प्रवास, पार्थ पवारांनी दिले हे स्पष्टीकरण
- Shinde group : उद्धव ठाकरेंचा विधान परिषदेसाठीचा मार्ग खडतर करण्याची शिंदे गटाची खेळी
- single window : लाईव्ह इव्हेंट्स परवानगीसाठी ‘एक खिडकी’ सुविधा; राज्य शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय
- प्रकल्पग्रस्तांसाठी असलेल्या सदनिकांच्या वाटपात १०० कोटी रुपयांहून अधिकचा घोटाळा, संजय राऊत यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र