Amit Satam : उद्धव ठाकरेंचे भाषण सडकं आणि नासलेलं, अमित साटम यांचा घणाघात

विशेष प्रतिनिधी

मुंबई : उद्धव ठाकरेंचे भाषण सडकं आणि नासलेलं हाेतं. हिंदुत्व सोडल्यानंतर गर्दी कशी कमी होते, याचे उत्तम उदाहरण महाराष्ट्राच्या जनतेने पाहिले, असा घणाघात मुंबई प्रदेश भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित साटम (Amit Satam) यांनी केला आहे. हिंदुत्वाच्या भूमिकेपासून दूर गेल्यामुळेच पक्षाची आणि नेतृत्वाची आज दयनीय अवस्था झाली, असा टाेलाही त्यांनी लगावला.



दसरा मेळाव्यात बाेलताना उध्दव ठाकरे म्हणाले हाेते की, जर तुम्ही हिंदुत्व शिकवण्याचा प्रयत्न करत असाल तर आम्ही भाजपला परत सांगतो की तुमच्या फडक्यावरचा हिरवा रंग तुम्ही काढून टाका आणि मग आमच्याशी हिंदुत्वाचा गप्पा मारा. तुमचं ते फडकंच आहे कारण तो भगवा असूच शकत नाही कारण भगवा हा शिवसेनेच्या हातात आहे.Amit Satam

यावर उध्दव ठाकरे यांच्यावर हल्लाबाेल करताना अमित साटम (Amit Satam) म्हणाले, उद्धव ठाकरेंचं एक सडकं आणि नासलेलं भाषण झाले. हिंदुत्व सोडल्यानंतर गर्दी कशी कमी होते याचा एक उत्कृष्ट उदाहरण आणि दृश्य आज शिवाजी पार्क वरती महाराष्ट्राच्या जनतेने पाहिलेला आहे आणि आपल्या वडिलांकडून आपण हिंदुत्वाचे धडे घेतले नाहीत म्हणून तुमची ही अवस्था झालेली आहे. नाहीतर तुम्ही स्वतः मुख्यमंत्री असताना तुमच्या 54 पैकी 44 आमदार तुम्हाला सोडून गेले नसते.

कोविडमध्ये मुंबईकर म्हणत असताना तुम्ही बेस्ट सीएम कसे झालात? हे कसं मॅनेज करून घेतलं, याची थोडीशी माहिती आपण महाराष्ट्राच्या जनतेला दिली असती तर बरं झालं असतं, असा टोला लगावत अमित साटम म्हणाले, तुमच्या प्रचार फेऱ्यांमध्ये पाकिस्तानचे झेंडे फडकले होते, तुमच्या उमेदवाराबरोबर आरोपी प्रचार करत होता, हे तुमचे हिंदुत्व. त्यामुळे तुमची आज ही अवस्था झालेली आहे. यापुढे मुंबईतील नाक्या नाक्यावर आणि कट्ट्या कट्ट्यावर चर्चा होणार, ती फक्त तुमच्या भ्रष्टाचाराची आणि राजकारणाचीच. तुमच्या भ्रष्टाचाराच्या, आतंकवादाचा आणि मतांच्या रावणाचं दहन होणार म्हणजे होणारच.

Uddhav Thackeray’s speech was harsh and vulgar, Amit Satam slams him

महत्वाच्या बातम्या