विशेष प्रतिनिधी
सिंधुदुर्ग : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे दररोज विरोधकांवर तुटून पडत असतात. विशेषतः शिंदे गटावर तर जास्तच आगपाखड करतात. मात्र तरीही शिवसेना शिंदे गटाचे आमदार निलेश राणे यांनी संजय राऊत यांचा आम्हाला फायदा होत असल्याचे म्हटले आहे.
शिवसेनेचं ऑपरेशन टायगर सुरू आहे. मात्र संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांचाच पत्ता कधी कट होईल? सांगता येत नाही, असे म्हटले आहे. यावर बोलताना निलेश राणे म्हणाले कि, संजय राऊत यांच्या अशाच बोलण्यामुळे महाराष्ट्रातील लोकं आमच्याकडे वळत आहेत. संजय राऊत यांच्या तिरस्काराचा फायदा आम्हाला होतो. संजय राऊत यांनी असंच बोलत रहावं काही अडचण नाही.
एकनाथ शिंदे यांचा पत्ता कट होण्याच्या टीकेवर पलटवार करताना निलेश राणे म्हणाले, . ‘संजय राऊत हे नेहमी काही नाही काही बोलत असतात. त्यांना रोज काय उत्तर द्यायचं ? संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांचा पत्ता राजकारणातून कट करून टाकला आहे. हे कधी तुम्ही कधी बोलणार आहात की नाही? उद्धव ठाकरे यांना राजकीय दिवाळखोरीत टाकले. उद्धव ठाकरे यांचा वेळोवेळी काटा कोणी काढला, पवारांचा माणूस आतमधून कोण आहे हे उद्धव ठाकरे यांना एकदा कळलं तर..’
महत्वाच्या बातम्या
- अंजली दमानिया यांच्यावर धनंजय मुंडे दाखल करणार फौजदारी अब्रुनुकसानीचा खटला
- पंतप्रधान नरेंद्र मोदी कुंभमेळ्यात, दिल्लीत आज मतदान
- Anjali Damania : अंजली दमानिया यांनी वाचला धनंजय मुंडेंच्या भ्रष्टाचाराचा पाढा, कृषीमंत्री असताना दुपटीहून दराने खरेदी
- Supriya Sule : पीकविमा योजनेतील भ्रष्टाचार प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई, खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रश्नावर केंद्रीय कृषिमंत्र्यांचे आश्वासन