Amol Mitkari “पांडुरंगाच्या इच्छेने” वक्तव्याचा फटका; तटकरे यांचा अमोल मिटकरींना खरमरीत इशारा

विशेष प्रतिनिधी

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी केलेल्या “पांडुरंगाच्या इच्छेने एकत्र येऊ” या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या असताना, त्यावर आता प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (sunil tatkare) यांनी थेट नाराजी व्यक्त केली आहे. मिटकरींना जाहीरपणे झापत तटकरे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, पक्षाच्या अधिकृत भूमिकेव्यतिरिक्त कुठलेही अनावश्यक वक्तव्य नको. Amol Mitkari

अमोल मिटकरी यांनी नुकतीच अशी शक्यता व्यक्त केली होती की आषाढी वारीपूर्वी अजित पवार आणि शरद पवार गट पुन्हा एकत्र येऊ शकतात. त्या पार्श्वभूमीवर अमोल मिटकरींचे ‘पांडुरंगाच्या इच्छेने’ हे विधान पुढे आले. मात्र हे विधान पक्षाच्या वरिष्ठ पातळीवर खटकल्याचं स्पष्ट झालं आहे.

तटकरे म्हणाले, “मिटकरींनी जबाबदारीने बोलायला हवं. ते पक्षाचे प्रवक्ते आहेत. एकदा भूमिका मांडली की वारंवार त्यावर बोलणं टाळावं. अशा वक्तव्यांमुळे गोंधळ निर्माण होतो.”



तटकरे यांनी यावेळी पक्षाच्या भूमिका स्पष्ट करत सांगितले, “आम्ही सध्या राज्यात महायुतीमध्ये असून, केंद्रात एनडीएमध्ये आहोत. हा निर्णय अजित पवार, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, दिलीप वळसे पाटील आणि माझ्यासह सर्व प्रमुख नेत्यांनी एकमताने घेतला आहे. त्यामुळे यात कोणताही गोंधळ नाही. कोणी यायचं ठरवलं असेल, तर त्यांनी निर्णय घ्यावा. पण आमची भूमिका ठाम आहे.”

दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीबाबत संशय व्यक्त केला होता. त्यावर पलटवार करत तटकरे म्हणाले, “लोकसभेच्या निकालानंतर राहुल गांधींनी पाच मुख्यमंत्री आणि ४०-५० मंत्र्यांची यादी जाहीर केली होती. पण विधानसभा निकालात जनतेने त्यांना चपराक दिली. आम्हाला विजय मिळाला की ते ईव्हीएमवर संशय घेतात, आणि त्यांना मिळाला की ते कर्तृत्व म्हणतात. हे सरळ दुटप्पी धोरण आहे.”

“Panduranga’s wish” statement backfires; Tatkare’s stern warning to Amol Mitkari

महत्वाच्या बातम्या